श्री क्षेत्र वलझडवाडी, जय गिरनारी दत्त दत्त नवनाथ पायी पालखी सोहळानिमित्त बारामती येथे पहिले व दुसरे अश्व रिंगण सोमेश्वर येथे संपन्न
महाशिवरात्री एकादशी उत्सव निमीत्त दर वर्षी प्रमाणे याही वर्षीही श्री क्षेत्र मळद ते श्री वलझडवाडी पायी पालखी सोहळा जय गिरनारी वलझडवाडी दत्त दत्त नवनाथ हा मंत्र जप करत हजारो भक्तासह मळद येथून सुरू झाला .आज दिनांक ३ रोजी पालखीचा मुक्काम श्री हरी कृपा नगर बारामतीे येथे होणार आहे .पुढील दिनांक ४ रोजी मुककाम कालभैरव मंदीर पणदरे पंधारे येथे, दिनांक ५ रोजी मुककाम सोमेश्वर मंदीर करंजे येथे, दिनांक ६ रोजी मुककाम निरा दत्त घाट येथे, दिनांक ७ रोजी मुककाम कालभैरव मंदीर वाघोशी ता.खंडाळा येथे, आणि दिनांक ८ रोजी श्री क्षेत्र वलझडवाडी येथे महाशिवरात्री एकादशी निमीत्त हा सोहळा पोहचणार असल्याचे सोहळा प्रमुख यांनी माहिती दिल. तीन पालखी प्रदक्षिणा होणार आहेत.रात्री बारा वाजता बेलफुले वाहण्याचा कार्यक्रम होत असतो. पहाटे वलझडवाडी दत्त दत्त नवनाथ टेकडीस तीन प्रदक्षिणा होणार आहेत.सकाळी महाप्रसाद होवून पायी पालखी सोहळा संपन्न होईल.या पालखी सोहळयात तीन घोडे रिंगण होत आहेत पहीले रिंगण बारामती मुककामी.दुसरे रिंगण सोमेश्वर मंदीर येथे दुसरे अश्व रिंगण संपन्न झाले सदर रिंगण पाहण्यासाठी सोमेश्वर पंचक्रोशीतील भक्त गण मोठ्या संख्येने उपस्थित होते.