विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या तिमाही बैठकीचे ११ मार्च रोजी आयोजन
पुणे - पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची तिमाही बैठक सोमवार ११ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नवीन इमारतीत सभागृह क्र.१ येथे आयोजित करण्यात आली असल्याचे महसूल उपायुक्त रामचंद्र शिंदे यांनी कळविले आहे.
प्रत्येक तीन महिन्यातून एकदा त्या महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक घेण्यात येते. या बैठकीत तीन महिन्यांत आलेल्या तक्रारी व त्यावर केलेल्या उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात येतो.