कोऱ्हाळे येथील महाशिवरात्री निमित्त सिद्धेश्वर मंदिरात शिवलिंगांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी
कोऱ्हाळे बुद्रुक प्रतिनिधी सोमनाथ लोणकर
बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक परिसरातील श्रद्धस्थान असणाऱ्या सिद्धेश्वर मंदीरात शिवलिंगांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.येथील हे मंदीर पांडवकालीन आसून ,या मंदिराचे बांधकाम हे हेमाडपंथीय आहे.
सिध्देश्वर मंदिर प्राचीन असून इतिहासात या मंदीराचा उल्लेख आहे मंदिरामध्ये दर सोमवारी सिद्धेश्वरचा छबिना निघतो . पहाटे ४ वाजता प्रदोष पूजा असते तसेच १५ नंदादीप अखंड चालू असतात .या शिवाय सर्व देव देवतांचे दर्शन या मंदिरात एकाच ठिकाणी होते. मंदीराच्या पोरोहित्याचा मान गुरव बंधुंकडे आहे .आज पहाटे पासूनकोऱ्हाळे बुद्रुक ,कोऱ्हाळे खुर्द ,वडगांव निंबाळकर ,माळशिकारेवाडी लाटे बजरंगवाडी येथील भक्त शिवलिंगाचे दर्शना साठी आले होते.
कोऱ्हाळे बुर्दुक परीसरातील माळशिकारे परिवारांच्या वतीने सकाळी ८ ते रात्री८ पर्यंत येणाऱ्या सर्व शिवभक्तांसाठी खिचडी ,केळी प्रसादाचे आयोजन केले होते. यासाठी ४०० कोलो शाबुदाणा,२५० किलो शेंगदांने तसेच शेंगदाणे तेल ९० किलो वापरुन करण्यात आला.