बारामती ! बालसंस्कार वर्ग निबंध स्पर्धा संपन्न
बारामती प्रतिनिधी :-
सिद्धार्थ नगर बुद्ध विहार आमराई बारामती येथे गेल्या एक महिन्यापासून बालसंस्कार सुरु करण्यात आला आहे.सदर संस्कार वर्ग भारतीय बौद्ध महासभा व भारतीय युवा पॅंथर संघटना यांनी सुरू केला आहे.दर रविवारी एक उपक्रम राबविला जातो त्याप्रमाणे या रविवारी निबंध स्पर्धा घेण्यात आली. येत्या रविवारी निबंध स्पर्धेचे बक्षिस वितरण करणार आहे.सदर उपक्रम नियमित सुरू राहण्यासाठी अस्मिता शिंदे, समाधान लोंढे,संकेत शिंदे, काम करीत आहेत.संस्कार वर्गातील मुलांना पूजापाठ घेणे तसेच इतर शैक्षणिक अडचणी सोडविण्यासाठी सतत काम करीत असतात.
भारतीय युवा पँथर संघटना सदर उपक्रम नियमित व्हावा यासाठी प्रयत्नशील राहील.सिद्धार्थ नगर येथील युवा वर्ग यामध्ये खूप सहकार्य करीत आहे.भारतीय युवा पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांच्या समवेत संघटनेचे पदाधिकारी महाराष्ट्र संपर्कप्रमुख शुभम गायकवाड, जिल्हाध्यक्ष अस्लम शेख, बारामती शहराध्यक्ष निखिल भाई खरात बारामती शहर संघटक समीर खान व सदस्य सर्वजण सदर उपक्रमासाठी सहकार्य करतात.