श्री सोमेश्वर व माळेगाव साखर कारखाना येथील ऊसतोड कामगारांच्या ६७० बालकांना पोलिओचे लसीकरण
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
५ ते ७ मार्च या कालावधीत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील आज राहिलेल्या बालकांचे घरोघरी जाऊन वैद्यकीय पथकामार्फत पोलिओचे लसीकरण करण्यात येणार आहे. सर्व पालकांनी आपल्या बालकांचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन बारामती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी केले होते या अनुषंगाने बारामती तालुक्यामध्ये ० ते ५ वर्षे वयोगटातील एकूण ३८ हजार ६०५ बालके आहेत. त्यापैकी आज रोजी झालेल्या पोलिओ लसीकरण कार्यक्रमात एकूण ३७ हजार ८३२ (९८ टक्के) बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे. या करीता एकूण ३२९ पोलिओ बुथ व त्यासाठी ८४९ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. १६ फिरती पथके आणि १२ रात्रपाळी पथके, २ ट्रान्झिट पथक तयार करण्यात आले होते. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, माळेगाव सहकारी साखर कारखाना येथे ऊसतोड कामगारांच्या ६७० बालकांना पोलिओचे लसीकरण करण्यात आले.