अहमदनगर ! जगद्गुरु संत तुकाराम महाराज बिजोत्सवानिमित्त सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
मुख्य संपादक-विनोद गोलांडे
अहमदनगर येथे विठ्ठल मंदिर, शेंगागल्ली, गंजबाजार येथे गुरुवार दि २१ पासून जगद्गुरु संत तुकाराम महाराज बिजोत्सवानिमित्त पारायण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला . सालाबादप्रमाणे जगद्गुरु संत तुकाराम महाराज बिजोत्सवाचे विठ्ठल मंदिर, शेंगागल्ली, गंजबाजार, नगर येथे दि. २१ ते २८ मार्च पासून सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते .तसेच गाथा पारायणाचे व्यासपीठ चालक म्हणून हभप विनायक महाराज काळे यांनी सर्व समाज बांधव एकत्र येथे मोठ्या आनंदमय वातावरण संपन्न झाले.
तसेच रविवार दि.२४ रोजी सामाजिक उपक्रम म्हणून आनंदऋषीजी रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते तर रांगोळी स्पर्धाही संपन्न झाल्या... कार्यक्रमास भाविक-भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सत्संगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुलवंत वाणी समाज विठ्ठल-मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष व विश्वस्त यांनी केले होते या आवाहनाला सर्व समाज बांधव यांनी उस्फुर्त प्रतिसाद देत जगतगुरु संत तुकाराम महाराज
बिजोत्सवानिमित्त सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यामुळे कुलवंत वाणी समाज विठ्ठल-मंदिर ट्रस्ट वतीने सर्वांचे मनःपूर्वक आभार धन्यवाद मानले.