सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयातील स्नेहा वेदपाठक हिने राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक उत्कर्ष स्पर्धेत संकल्पना नृत्य प्रकारात तृतीय क्रमांकाचे पारितोषिक
सोमेश्वरनगर :- उत्कर्ष- राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे दि १७ ते २० मार्च २०२४ दरम्यान करण्यात आले होते या स्पर्धेत महाराष्ट्रातील १६ विद्यापीठांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघामधून १८ स्वयंसेवकांची निवड करण्यात आली होती. यामध्ये सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाची स्वयंसेविका कु स्नेहा उत्तम वेदपाठक हिची संकल्पना नृत्य या प्रकारासाठी निवड झाली होती. यामध्ये तिला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. या गौरवस्पद कामगिरीसाठी स्नेहाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. यासाठी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. राजेश निकाळजे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संपतराव सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन मिळाले .
श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने स्नेहा व तिच्या पालकांचा संस्थेचे संचालक प्रतिनिधी आनंदकुमार होळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळेस संस्थेचे सचिव भारत खोमणे , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस बी सूर्यवंशी, इंजीनियरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय देवकर, एमबीए कॉलेजचे डायरेक्टर डॉ. निलेश लिंबोरे व इतर प्राध्यापक , प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
तसेच संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप , उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे व इतर सर्व संचालक मंडळ यांनीही स्नेहा वेदपाठकचे या यशाबद्दल कौतुक व अभिनंदन केले.