करंजेपुलचे उपसरपंच यांनी एक सामाजिक बांधिलकी जपत... त्या मातीच्या ढिगाऱ्यावर दिशादर्शक रिफ्लेकर लावले.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
सोमेश्वर मंदिर ते करंजेपूल येथे मुख्य रस्त्यालगत करंजेपुल ग्रामपंचायत(ता बारामती) अंतर्गत विकास कामे सुरू आहे तसेच या रस्त्यालगत गटर लाईनचे काम चालू आहे .. गटर लाईन चा खड्डा व त्या शेजारील मातीचा डिग रात्रीच्या वेळी या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या नागरीकांना दिसून येत नाही यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही या अनुषंगाने करंजेपुल उपसरपंच प्रवीण गायकवाड यांनी त्वरित दखल घेत ... तेथे असलेल्या मातीच्या ढिगावर रात्रीचे चमकणारे दिशादर्शक रिफ्लेक्टर स्वरूपात बाणाचे चिन्ह लावल्याने व होणाऱ्या दुर्घटना टळत असल्याने व एक सामाजिक बांधिलकी जपली आहे,या कार्याबद्दल उपसरपंच प्रवीण गायकवाड यांचे आभार व नागरिक प्रवाश्यांनकडून कौतुक होत आहे.