सोमेश्वरनगर ! पिचकऱ्यांमधील रंग उडविण्यात चिमुकले झाले दंग...
सोमेश्वरनगर - भल्या सकाळपासूनच चिमुकल्यांनी पिचकऱ्यामध्ये रंग भरून एकमेकांच्या अंगावर उडवत होलीकोत्सव सुरू केला.तसेच सोमवार दि २५ रोजी असणाऱ्या धुलीवंदनाच्या निमित्त रंग खेळण्याची प्रथा असल्याने सोमेश्वर नगर परिसरात चिमुकले कुठे रंग, तर कुठे पाणी, फुग्यामध्ये पाणी असा खेळ पाहताना तरुणाईला सुद्धा मोह आवरला नाही.बारामती तील सोमेश्वरनगर परिसरातील शाळेला सुट्टी असल्याने चिमुकल्यांन सह तरुणाईच्या रंगपंचमीला उधाण आलेआहे. गल्ली-बोळामध्ये आणि तसेच सोमेश्वरनगर परिसरतील गावांमधील आवारात चिमुकले वॉटरकलरची मुक्त उधळण करीत होते. सूर्यप्रकाशाची सोनेरी किरणे अंगावर झेलत, बादल्यांमध्ये व विविध भांड्यात भरलेले सप्तरंगी पाणी पिचकऱ्यामध्ये भरून एकमेकांच्या अंगावर उडविण्यात चिमुकले दंग झाले होते.
दहावी-बारावीची परीक्षा संपली असल्याने तरुण मुलांनी रंगांची उधळण करीत धुुुलीवंदनाच्याददिवशी विविध रंगाचा आनंद लुटला.