सोमेश्वरनगर ! विविध उपक्रम राबवत करंजेपूल ग्रामपंचायतीच्या वतीने महिला दिन साजरा
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजेपूल ग्रामपंचायतीच्या वतीने नुकताच महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन लोकनियुक्त सरपंच पुजाताई वैभव गायकवाड यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.या प्रसंगी ग्रामपंचायत करंजेपूलचे उपसरपंच शेखर गायकवाड व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.विविध उपक्रम रावबत व महिला दिनाचे औचित्य साधून महिला आरोग्य तपासणी व मार्गदर्शन प्राथमिक आरोग्य केंद्र होळ यांचे वतीने करण्यात आले.या प्रसंगी डॉ.मोनाली जाधव यांनी महिलांच्या आरोग्या विषयी मार्गदर्शन केले.महिला सक्षम आणि स्वावलंबी व्हावी याकरिता महिलांना व्यवसायासाठी अश्विनी बर्गे यांनी मनोबल वाढविणारे विचार मांडले.शेतीतून पिकणारी पीके ही रासायनिक खतांनी व प्रदूषित पाण्याने मानवी आरोग्याला विषमय झाली आहेत म्हणून सेंद्रिय शेतीचा अंगीकार करावा असे शेती तज्ञ पृथ्वीराज लाड यांनी कार्यक्रम प्रसंगी बोलताना सांगितले.स्त्री सध्या सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे तीने स्वावलंबी बनावे दुचाकी चारचाकी वाहन चालवावे असे अग्रही मत मांडत पवार मॅडम यांनी मोटार ड्रायव्हिंगचे महत्व समजावून सांगितले.महिलांची नेत्र तपासणी विराज आॅप्टीशियन करंजेपूलचे सचिन शेंडकर यांनी केली.सर्वांगिण स्वरूपाच्या या महिलादिनाच्या कार्यक्रमाची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली.महिलाचा सहभाग उल्लेखनीय होता , यावेळी कोमल निलेश गायकवाड ,सीमा शशिकांत गायकवाड ,रेश्मा नितीन गायकवाड,नम्रता सागर गायकवाड,संगीता आळंदीकर , वृषाली गायकवाड, राणी शिंदे ,वनिता गायकवाड ,उषा गायकवाड ,इंदुमती वीरकर ,सोनाली गायकवाड ,अनिता गायकवाड ,कोमल सूर्यकांत गायकवाड ,संगीता निर्मळ, संगीत लकडे, प्रविणा गायकवाड, सविता लकडे, यादव, सारिका मगर, सुनीता पवार, अंगणवाडी पर्यवेक्षक शीतल सचिन कोठारी,अंगणवाडी सेविका रेश्मा श्रीकांत शेंडकर इत्यादी महिला उपस्थित होत्या तसेच उपस्थितांचे आभार ग्रामसेविका सुजाता आगवणे यांनी मानले.