सुपे परगण्यातील महेश चांदगुडे-सर यांची बारामती तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी निवड
बारामती प्रतिनिधी
सुपे (बारामती) शुक्रवार दि.२२.राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या कार्यकारिणी बैठकीत सुपे परगण्यातील महेश प्रकाश चांदगुडे-सर यांची बारामती तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष श्री सुरज चव्हाण, तालुकाध्यक्ष संभाजीनाना होळकर, बारामती युवक चे अध्यक्ष राहुल वाबळे यांनी या निवडीचे पत्र दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसंघटना, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार, आदरणीय सुनेत्रावहीनी पवार यांची विकासाची भुमिका सर्व जनतेपर्यंत पोहचविण्याकरीता आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बारामती तालुका उपाध्यक्ष पदाची जबाबदारी स्विकारली असुन भविष्यात पक्षाची ध्येय-धोरणेअधिक प्रभावीपणे सर्व तळागाळातील लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहचविणार असल्याचे मत महेश चांदगुडे सरांनी व्यक्त केले.यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश, जिल्हा व तालुका कार्यकारिणी चे सर्व पदाधिकारी, बारामती दुध संघाचे संचालक सुशांत जगताप, मा. उपसरपंच शांताराम चांदगुडे, मयुर जाधव, संजय राऊत उपस्थित होते.