वाल्हे येथील इप्तार पार्टीला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वाल्हे प्रतिनिधी : रमजान महिन्याचे औचित्य साधून आमदार संजय चंदुकाका जगताप मित्र परिवारातर्फे वाल्हे ( ता.पुरंदर ) येथील शाही सुन्नी मशिदीत सालाबादप्रमाणे रोजा इप्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मुस्लीम बांधवांसह महिला वर्गाने देखील रोजा इप्तार पार्टीत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दर्शविल्याने मस्जिद परिसर अक्षरशः गजबजून गेला होता.
यावेळी संजय जगताप मित्र परिवारातर्फे मुस्लीम समाजातील उपवास धारकांना रोजा इप्तारीसाठी सरबत मिठाईसह फळांचे वाटप करण्यात आले.त्यानंतर मगरीबची नमाज अदा झाल्यावर रोजा इप्तार पार्टी उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. या दरम्यान विविध मान्यवरांकडून रमजान महिन्याच्या शुभेच्छा देखील देण्यात आल्याने मुस्लीम बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
या कार्यक्रमास वाल्हे गावचे सरपंच अतुल गायकवाड तसेच अॅड.विजय भालेराव अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष मोबीन बागवान रफिक शेख आबिद आतार सामाजिक कार्यकर्ते नाना दाते अतुल पवार सागर भुजबळ सतीश पवार दादासाहेब मदने संतोष पवार शैलेंद्र भोसले रामभाऊ मदने महर्षी वाल्मिकी वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष अशोक महाराज पवार यांसह मौलाना शकील शेख आरिफ पठाण सिकंदर इनामदार आरिफ आतार मोहसीन पठाण समीर आतार असलम नदाफ बाबासाहेब इनामदार शौकत शेख आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाही सुन्नी मस्जिद ट्रस्टचे संस्थापक सिकंदर नदाफ यांनी केले तर उपस्थितांचे आभार चांदभाई शेख यांनी मानले.
चौकट : जातीय सलोखा अबाधित रहावा ..
जातीय सलोखा अबाधित रहावा तसेच मित्रत्वाची भावना देखील वाढली पाहिजे या उद्देशाने आमदार संजय जगताप मित्र परिवाराकडून पुरंदर हवेलीतील सर्व मशिदीत इप्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अल्पसंख्यांक विभागाचे तालुकाध्यक्ष मोबीन बागवान यांनी दिली.