राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या सोशल मीडिया संघटनेच्या बारामती तालुका उपाध्यक्षपदी प्रदीप मांगडे यांची निवड.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या प्रदेश अध्यक्षांच्या मान्यतेने वाघळवाडी येथील लोक प्रसिध्द युवक म्हणून ओळख असणारे प्रदीप भगवान मांगडे ( दादू ) यांची बारामती तालुका सोशल मीडिया संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आज वाणेवाडी येथे युगेंद्र पवार यांच्या हस्ते दादू मांगडे यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
दादू मांगडे हे नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात कोविड काळामध्ये त्यांनी केलेले काम उल्लेखनीय काम म्हणून आजही त्यांच्या त्या कामाच्या आठवणी लोकांच्या डोळ्यासमोर उभे राहतात.पक्ष संघटन वाढवण्यासाठी रात्रंदिवस काम करणार असल्याचे दादू मांगडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
आमच्या पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवार या भरघोस मतांनी विजय होतील जनतेतून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे असे देखील यावेळी मांगडे यांनी बोलताना सांगितले.