करंजे उपसरपंच पदी मयुरी प्रतापराव गायकवाड यांची निवड
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत करंजे उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया मंगळावर दि १९ मार्च रोजी ग्रामपंचायत कार्यालय लोकनियुक्त सरपंच भाऊसो हुंबरे यांचे अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली मावळते उपसरपंच सचिन पवार यांनी राजीनामा दिल्याने पुढील उपसरपंच पदासाठी इच्छुक उमेदवारी असलेल्या सदस्यांनी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक लागली उपसरपंच पदासाठी मयुरी प्रतापराव गायकवाड व अफसना अमर मुलाणी यांचा अर्ज आल्याने निवडणूक प्रक्रिया लागली मयुरी प्रतापराव गायकवाड या ९/१ या मताधिक्याने अफसना मुलाणी यांचा पराभव झाल्याने उपसरपंच मयुरी प्रतापराव गायकवाड यांचे उपसरपंच म्हणून नाव घोषित केले निवडणूक प्रकिया ग्रामसेवक चंद्रशेखर काळभोर यांनी पार पाडली.
याप्रसंगी प्रणाली शिक्षण संस्था अध्यक्ष बुवासाहेब हुंबरे, करंजे तंटामुक्ती अध्यक्ष प्रतापराव गायकवाड, निरा कृषि उत्पन्न बाजार समिती सदस्य बाळासाहेब शिंदे,जेष्ठ माऊली केंजळे,नंदकुमार मोकाशी, सतीश पवार, बारामती शिवसेना विभागप्रमुख बंटी गायकवाड, राकेश गायकवाड,माजी उपसरपंच बापूराव सावंत,पत्रकार विनोद गोलांडे सह ग्रामपंचायत सर्व सदस्य कर्मचारी वृंद व इतर मान्यवर ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.