तालुका चर्मकार संघाच्या उपाध्यक्षपदी शिवाजीराव ढमढेरे
दाैंड - तालुका प्रतिनिधी सुभाष कदम
राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या दाैंड तालुका चर्मकार संघाच्या उपाध्यक्षपदी श्री.शिवाजी गुलाबराव ढमढेरे यांच्या निवडबद्दल परिसरातून अभिनंदन हाेत आहे.ढमढेरे शिवाजी गुलाबराव यांच्या दाैंड तालुक्यातील सामाजिक,धार्मिक,सांस्कृतिक व राजकीय तसेच आलेगाव ग्रामपंचायत व आलेश्वर विकास साेसायटीच्या माध्यमातून केलेल्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घाेलप,महासचिव ज्ञानेश्वर कांबळे व पदाधिकारी यांनी दाैंड तालुका उपाध्यक्षपदी निवड करुन त्यांना सन्मान पूर्वक निवडीचे पत्र दिले आहे.
यावेळी शिवाजी ढमढेरे म्हणाले वरीष्ठांनी माझ्यावर साेपविलेल्या उपाध्यक्षपदाच्य माध्यमातून मी दाैंड तालुक्यातील सर्व सामान्य चर्मकार समाज बांधवांना बराेबर घेऊन त्यांच्या अडीअडचणी साेडविण्यासाठी व संत राेहिदास महाराजांचे विचार सर्व सामान्यांपर्यंत पाेहचविण्यासाठी प्रयत्नशील राहून काम करणार आहे.तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघाची ध्येय धाेरणे सामान्य जनतेपर्यंत पाेहचविण्यासाठी काम करणार आहे.
या निवडीबद्दल.अनिलराव ठवाळ संपादक साप्ताहिक श्रीगाेंदा जागृती,मा.सरपंच ग्रामपंचायत आढळगाव,अहमदनगर जिल्हा परिषदेचे मा.सदस्य व जिल्हा नियाेजन समितीचे विद्यमान सदस्य तसेच श्रीगाेंदा पंचायत समितीच्या मा.सदस्या व आढळगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच अनुराधा ठवाळ तसेच आलेगाव ग्रामपंचायत, आलेश्वर विकास साेसायटी व ग्रामस्थांच्या वतीने.शिवाजीराव ढमढेरे यांच्या निवडीबद्दल अभिनंदन व काैतुक करुन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.