सोमेश्वरनगर ! विद्या प्रतिष्ठानमध्ये विद्यार्थिनींना सायकल वाटप.
सोमेश्वर नगर - बारामती तालुक्यातील विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल सी.बी.एस.ई. वाघळवाडी येथील १०१ विद्यार्थिनींना बारामती मतदारसंघातील खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते सायकलीचे वाटप शुक्रवार दि १५ मार्च रोजी सुप्रियाताई सुळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
तसेच व्यासपीठावर आपल्या अध्यक्षीय भाषणातून सुप्रियाताईंनी मुलींच्या शिक्षणासाठी विविध सुविधा तसेच मुलींच्या शाळेकडे जाणाऱ्या प्रवासातील वाहनांचा असणारा अडसर बाजूला करून मुलींना शिक्षणासाठी प्रेरित करणे हा या सायकल वाटप मागील मुख्य उद्देश असल्याचे आवर्जून सांगितले.
यावेळी सुप्रिया ताईंनी सायकल मिळालेल्या विद्यार्थिनींची अनोपचारिक संवाद साधत त्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सायकल मिळालेल्या विद्यार्थिनी, सर्व पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
तसेच संस्थेचे रजिस्टर श्रीष कांम्बोज व शाळेचे मुख्याध्यापक सचिन पाठक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनीही उपस्थिती दर्शवली.