मु सा काकडे महाविद्यालयात 'स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी’ या विषयावर मार्गदर्शन
मुख्य संपादक-विनोद गोलांडे
सोमेश्वरनगर -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, आणि मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर-वाघळवाडी, ता. बारामती, जि. पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आणि मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन युवकांसाठी “स्पर्धात्मक परीक्षा” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन गुरुवार दि. ८ फेब्रुवारी २०२४ रोजी करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन सकाळी १०.०० वा. महाविद्यालयीन व्यवस्थापन समितीचे सचिव तथा कार्यशाळेचे अध्यक्ष सतिश लकडे, प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांच्या हस्ते झाले. या कार्यशाळेला महाविद्यालयाच्या विविध शाखांमधील ९२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रजनीकांत गायकवाड यांनी केले. उद्घाटन प्रसंगी आजच्या युगात स्पर्धा ही जीवन घडविण्यापुरती मर्यादित राहिली नसून ती प्रथम स्वत:शी करावी लागत आहे. जरी रोजगाराच्या संधी वाढल्या असल्या तरी त्यासाठी स्पर्धा कित्येक पटीने वाढली आहे हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे असे मत प्राचार्य, डॉ. देविदास वायदंडे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
कार्यशाळेच्या प्रथम सत्रामध्ये डॉ. नारायण राजुरवार यांनी ‘स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी’ या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्याकरिता आत्मविश्वास आवश्यक आहे. जगातील कोणतीही परीक्षा माणूस हा प्रथम मनात जिंकतो. जर आपण मनात जिंकलो तरच जगात जिंकतो हे ध्यानात ठेवावे. प्रत्येक विद्यार्थ्याने परीक्षेची तयारी करताना आपला व आपल्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करून आपल्या जीवनाची दिशा ठरवावी. एकदा दिशा ठरली की यश आपोआप खेचून आणता येते असे सांगितले. तर कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रामध्ये डॉ. राहुल खरात यांनी ‘स्पर्धा परीक्षा : यश-अपयश’ या विषयावर मार्गदर्शन केले. प्रसंगी त्यांनी विविध स्पर्धा परीक्षांची माहिती दिली. त्यासाठी आवश्यक तयारी, अभ्यास, स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या यंत्रणा व त्यांची कार्यपद्धती यावर त्यांनी प्रकाश टाकला. तसेच कु. निकिता बनसोडे, कु. तृप्ती बनसोडे व श्रीदत्त धायगुडे यांनी कार्यक्रमाविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी समन्वयक प्रा. पी. वाय. जाधव, उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे, डॉ. जया कदम, डॉ. प्रविण ताटे-देशमुख, डॉ. जवाहर चौधरी, प्रा. अच्युत शिंदे, प्रा. मेघा जगताप, डॉ. संजू जाधव, डॉ. श्रीकांत घाडगे, डॉ. बाळासाहेब मरगजे, डॉ. निलेश आढाव, प्रा.आदिनाथ लोंढे, प्रा.रविकिरण मोरे, डॉ. कल्याणी जगताप, प्रा. कुलदीप वाघमारे, प्रा. अनिकेत भोसले, प्रा. सचिन भोसले, प्रा. गोरख काळे, अमोल काकडे, विनायक आगम, निखिल जगताप, सुजीत वाडेकर, अतुल काकडे, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. चेतना तावरे यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार प्रा. निलीमा देवकाते यांनी मानले.