इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षेत विद्या प्रतिष्ठानची इयत्ता १० तील वैष्णवी शेंडकर हिने'ए'श्रेणी घेत मिळवले यश
सोमेश्वरनगर - इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षेत विद्या प्रतिष्ठानची इयत्ता १० तील वैष्णवी नितीन शेंडकर हिने 'ए'श्रेणी घेत उत्तीर्ण झाली आहे तिच्या मिळालेल्या यशाबद्दल शेंडकर कुटूंबिय तसेच सोमेश्वर मित्र परिवाराच्या वतीने अभिनंदन होत आहे.
बारामती तालुक्यातील विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज सी.बी.एस.ई वाघळवाडी येथील इयत्ता ८ वी व ९ वी चे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४च्या चित्रकला ग्रेड परीक्षांसाठी प्रविष्ट झाले होते.
इयत्ता ८ वी तील विद्यार्थी एलिमेंटरी ग्रेड परीक्षांसाठी प्रविष्ट होते. एकूण १६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामधील अ श्रेणीतून ६ विद्यार्थी ब श्रेणीतून तर २ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
तसेच ९ वी तून १८ विद्यार्थी इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षेला बसले होते. त्यातील अ श्रेणी मधून ४ विद्यार्थी ब श्रेणी मधून ७ विद्यार्थी तर क श्रेणीतून ७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
शाळेतील कलाशिक्षिका रूपाली कदम व स्वप्ना वेदपाठक यांनी सदर परीक्षेसाठी मुलांना मार्गदर्शन केले. १००% निकालाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक सचिन पाठक यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.