शेंडकरवाडी येथे शिवजयंती उत्साहात साजरी
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील शेंडकरवाडी येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवप्रेमी युवकांनी किल्ले सिंहगडावरून शिवज्योत आणली, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेंडकरवाडी येथे समस्त महिला वर्गाच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.सोमवार रोजी सायंकाळी संपूर्ण वाडीमध्ये शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली, प्रतिमेचे पूजन करंजे सोसायटीचे व्हाईस चेअरमन मच्छिंद्र शेंडकर व करंजे सोसायटीचे मा. व्हाईस चेअरमन हनुमंत शेंडकर यांच्या शुभहस्ते करून मिरवणूकिला सुरुवात करण्यात आली, याप्रसंगी वाडीतील सर्व शिवभक्त उपस्थित होते.
लोकेश शेंडकर, मयूर जालिंदर शेंडकर, मयूर सतीश शेंडकर, वैभव शेंडकर, सोमप्रसाद शेंडकर, अमरदीप शेंडकर, अजय शेंडकर, अंकित शेंडकर, व सर्वांनी सहकार्य केले