कोणतीही एक कला जोपासा - डॉ. सदानंद भोसले बारामती - राष्ट्रीय सेवा योजना
बारामती प्रतिनिधी
बारामतीतील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती येथे युवक युवती उन्नयनीकारण व प्रशिक्षण विद्यापीठस्तर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी कोणतीही एक कला जोपासणे अत्यंत गरजेचे आहे असे सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सदानंद भोसले हे म्हणाले. पहिल्या दिवशीच्या कार्यशाळेत महाविद्यालयाचे प्रा.स्वामीराज भिसे यांनी संत साहित्यातून समाज प्रबोधन या विषयावर तर दुसऱ्या सत्रात सुपे ग्रामपंचायतचे सदस्य सोमनाथ कदम यांनी कविता, पथनाट्य व सूत्रसंचालन या विषयावर कार्यशाळा घेतली २४ फेब्रुवारीला रितेश पाटील यांनी पथनाट्य विषयी व अनिल केंगार यांनी भारुडातील समाज प्रबोधन याविषयी कार्यशाळा घेतली. अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जवाहर शाह (वाघोलीकर) , सचिव मिलिंद शहा (वाघोलीकर ), रजिस्टार अभिनंदन शहा, प्राचार्य डॉ. अविनाश जगताप, उपप्राचार्य डॉ.अशोक काळंगे, डॉ.सचिन गाडेकर, डॉ.योगिनी मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. विलास कर्डिले,कार्यक्रम अधिकारी डॉ. चंद्रकांत कांबळे, कार्यक्रम अधिकारी डॉ. निरंजन शहा यांनी आयोजन केले होते. या कार्यक्रमाला पुणे ग्रामीण महाविद्यालयातील अनेक स्वयंसेवक उपस्थित होते.