सोमेश्वरनगर ! मु.सा. काकडे महाविद्यालयात योगा,आरोग्य व स्वच्छता याविषयी प्रशिक्षण संपन्न.
संपादक-विनोद गोलांडे
सोमेश्वरनगर :- बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु.सा. काकडे महाविद्यालयात शुक्रवार दि
२३ रोजी योगा, शारीरिक तंदुरुस्ती व आरोग्य या विषयावर महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण व बी सी.ए. विभागाच्या वतीने कर्मचारी, विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रा. डॉ देवीदास वायदंडे यांच्या हस्ते झाले. आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्यांनी मोबाईल पासून बाजूला जाऊन प्रत्येकाने आपल्या शरीरासाठी वेळ द्यावा व शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्यावे
त्याचबरोबर वेळेचे अचूक नियोजन करून स्वतःसाठी दररोज नियमितपणे व्यायाम करावा तसेच निरोगी शरीर ठेवण्यासाठी संतुलित आहार घ्यावा आपली नकारात्मक विचारधारा, ताण, चिंता या आजारावर मात करायची असेल तर तुम्हाला पण
कोणत्याही प्रकारचे औषध घ्यायची गरज नाही योगाद्वारे तुम्ही या सर्वांवर मात कराल असे त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये सांगितले त्याचबरोबर शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांचे शारीरिक आरोग्य बरोबरच मानसिक आरोग्य
सुधारण्यासाठी महाविद्यालयामध्ये अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम राबवीत आहोत त्याचा सर्वांनी जास्तित जास्त फायदा घयावा असे सांगितले.
विवेक पाटील यांनी उपस्थितांशी हितगुज साधताना पारंपारिक व आधुनिकता याचा योग्य समन्वय साधला तर तुम्हाला कोणत्याही डॉक्टरकडे
दवाखान्यात जावे लागणार नाही हे सांगितले. माणसाने आपल्या जीवनशैलीमधे सुधारणा केली तर बरेचसे आजार हे तुमच्याजवळ येणारच नाहीत. हालचाल आणि शारीरिक तंदुरुस्ती याचा अतिशय जवळचा संबंध आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या शरीराची नेहमी हालचल ठेवली पाहिजे. प्रयेकाने दररोज किमान पाच कि.मी म्हणजेच एक हजार पावले चालले पाहिजे किवा एक हजारपावले उलटे चालले पाहिजे अथवा पाचशे पावले नागमोडी वळणाने चालले पाहिजे. बसने, उठने, चालने तसेच इतर मूलभूत हालचाली यांचे प्रात्यक्षिक दाखवून त्याचा तुमच्या शरीरचनेवर काय परिणाम होतो याविषयी माहिती सांगितली. आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आजार होऊ नये म्हणून माणसाने पूर्वजांचा इतिहास अभ्यासून त्यांचे राहणीमान त्यांच्या सवई, त्यांच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण अंगीकारला तर बरेचसे आजार आपल्याला होणारच नाहीत. उपवास केल्याने शारीरिक तंदुरुस्ती वाढण्यास मदत होते असे सांगतानाच माणसाने संतुलित आहाराबरोबरच तुमच्या वजनाच्या प्रमाणात कोथिंबीर, कच्च्या पालेभाज्या, काकडी, गाजर, बीट हे तुमच्या
आहारामध्ये असणे आवश्यक आहे असे सांगितले. त्याचबरोबर विविध आजारांवर हालचाल योग्यरीत्या केली तर सहज मात करता येते हे प्रात्यक्षिकासह सांगितले.कार्यक्रमाचे आयोजन शारीरिक शिक्षण संचालक डॉ. बाळासाहेब मरगजे व बी.बी.ए.सी.ए. प्रमुख प्रा. रजनीकांत गायकवाड यांनी केले याप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाला संस्थेचे सचिव सतीश लकडे, महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष अभिजित काकडे-देशमुख व संस्थेचे अध्यक्ष सतीशराव काकडे देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या.