●पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळणार आत्मरक्षणाचे प्रशिक्षण...
●जिल्ह्यातील १ हजार २७८ शाळा
पुणे - समग्र शिक्षा अंतर्गत राज्यातील २२ हजार शाळा मधे आत्मरक्षणाचे धडे देण्यात येणार आहेत. हिंसाचार करणाऱ्या गुन्हेगारांचा सक्षमपणे सामना करण्यासाठी मुली तयार करणे, कोणत्याही प्रकारच्या कठीण परिस्थितीचा खंबीरपणे मुकाबला करण्यासाठी मुलींना पारंगत करणे, त्यांच्यात आत्मविश्वास व जागृती विकसित करणे ही काळाची गरज आहे. याच उद्देशाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई चे प्रकल्प संचालक प्रदीप कुमार डांगे यांनी राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी केली आहे.
पुणे जिल्ह्यातील १ हजार २७८ शाळांमधील मुलींना जानेवारी,फेब्रुवारी व मार्च अशा ३ महिन्यात प्रशिक्षण देण्यात येत आहे. शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
येणाऱ्या काळात या उपक्रमाचा मुलींना निश्चित फायदा होणार आहे.