बारामती तालुका वारकरी सेवा संघाच्या वतीने ...त्या सनईवादकास "एक हात मदतीचा"
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील करंजे येथील सोमेश्वरमंदिर येथे राहत असलेले व सांप्रदायिक कीर्तन कार्यक्रमात प्रसिद्ध सनईवादक ह.भ.प.शाम महाराज भोसले काही दिवसांपूर्वी अपघात झाला .त्यांना गंभीर इजा झाली होती त्यांना त्वरित बारामती येथील दवाखान्यात उपचारासाठी पाठवले तसेच त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची गरीब असून त्यांना मदतीची गरज आहे त्यामुळे "एक हात मदतीचा" या भावनेतून बारामती तालुका वारकरी सेवा संघाच्या वतीने एका वारकरी बांधवांचे साठी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन व्हाट्सअप ग्रुप द्वारे व दिलेल्या नंबर वर गुगल पे किंवा फोन पे करावे असे केले होते ... या आव्हानाला प्रतिसाद देत अनेकांनी मदत केली त्यामुळे त त्यांची त्यांचा उपचार व त्यांचे प्रकृती आता चांगली आहे एकत्रित केलेली बारामती तालुका वारकरी सेवा संघाचे भोसले कुटुंबीयांनी आभार मानले