Type Here to Get Search Results !

●पुरंदर ! चारा डेपो व इतर दुष्काळी मागण्यासाठी रास्ता रोखो आंदोलन करणार.. आप पुरंदर..●महात्मा गांधी पुणयतिथी दिनापासून बेमुदत साखळी उपोषण गेले ६ दिवसांपासून सुरू ●मंगळवार दि ६ रोजी रास्ता रोखो करण्यात येणार.

●पुरंदर ! चारा डेपो व इतर दुष्काळी मागण्यासाठी रास्ता रोखो आंदोलन करणार.. आप पुरंदर..
●महात्मा गांधी पुणयतिथी दिनापासून बेमुदत साखळी उपोषण गेले ६ दिवसांपासून सुरू 

●मंगळवार दि ६ रोजी रास्ता रोखो करण्यात येणार.

पुरंदर - यावर्षी कमी पाऊस झाल्याने संपूर्ण राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या यादीत पुरंदर तालुक्याचा गंभीर स्वरूपाच्या दुष्काळ यादीत समावेश केला आहे. शासनाकडून तीन महिने आधी यासंदर्भात जीआर निघून सुधा दुष्काळी परिस्थितीत आत्ता पर्यंत कसलीच उपाय योजना करण्यात आली नसून सरकारने पूर्ण पणें दुर्लक्ष केले आहे.
                     चारा व पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना पशुधन सांभाळणे जिकरीचे झाले आहे.सरकारने दुष्काळाच्या गंभीर समस्येकडे लक्ष देत चारा डेपो त्वरित सुरू करावेत, पीक कर्जावरील व इतर शेती कर्जावरील व्याज माफ करावे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करून त्यांना एसटी पास मोफत देण्यात यावे , शेती पंपाचे पूर्ण लाईट बिल माफ करावे व दुष्काळ संदर्भात जीआर निघाल्या नंतर २१दिवसा पर्यंत तो लागू व्हावा असा कायदा सरकारने करावा. या मागण्यासाठी आम आदमी पार्टी पुरंदरने वाल्हे गावात महात्मा गांधी पुणयतिथी दिनापासून बेमुदत साखळी उपोषण शेतकऱ्यानं सोबत गेले ६ दिवसांपासून सुरू केले आहे. .
                  यावेळी तालुक्यातील विविध गावातील शेतकरी नागरिकांनी आपला पाठिंबा देण्यासाठी उपोषण ठिकाणी भेट दिली. पण प्रशासन व राज्यसरकार यांच्या कडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे मंगळवार दिनांक 6.02.24 रोजी सकाळी वाल्हे येथे पुणे पंढरपूर हायवे रास्ता रोखो करण्यात येणार आहे..

यावेळी आपचे पदाधिकारी कार्य करते दत्तात्रय कड, राजन पवार,महेश जेधे, संपत भुजबळ, माणिक पवार, सत्यजित जगताप, कुंडलिक पवार,संदीप चौडकर, अविनाश गायकवाड, शंकर नाना पवार, दत्तात्रय पांडकर, सचीन जगताप आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test