आम आदमी पक्ष पुरंदर वतीने चारा डेपो व इतर मागण्यासाठी साखळी उपोषण
मागण्या पूर्ण न केल्यास व मंगळवार ६ रोजी पुणे - पंढरपूर रास्ता रोको करण्या चा इशारा
पुरंदर प्रतिनिधी :-
राज्य सरकारने तीन महिने गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करून पशुधन
वाचविण्यासाठी कोणतीही उपाय योजना केलेली नाही.या अनुषंगाने आम आदमी पक्ष पुरंदर वतीने चारा डेपो व इतर मागण्यासाठी साखळी उपोषण
राज्य सरकारच्या अकार्यक्षमतेच्या विरोधात खालील मागण्यासाठी आम आदमी पक्षा
तर्फे पुरंदर तालुक्यात साखळी उपोषण महात्मा गांधी पुण्यतिथी दिना निमीत्त
मंगळवार ३० जाने. २०२४ सकाळी १० वाजे पासून सुरू करीत आले आजचा ४ दिवस आहे
तरी सर्व
यामध्ये जाहीर मागण्या स्वरूप...
१) चारा डेपो त्वरीत चालू करावा.
२) पिक कर्जावरील व इतर शेती कर्जावरील व्याज माफ करावे.
३) विद्यार्थ्यांची शैक्षणीक फी माफ करावी व एस. टी. पास मोफत करावा.
४) शेती पंपाची पूर्ण लाईट बील माफ झालीच पाहीजेत.
या वरील सर्व बाबी दुष्काळ जाहीर झाले नंतर २१ दिवसात लागू करण्यात यावा असा जी आर राज्य सरकारने काढावा तोपर्यंत चारा डेपो व इतर मागण्यासाठी साखळी उपोषण चालूच राहणार असल्याचे आप युवाअध्यक्ष महेश अर्जुनराव जेधे यांनी सांगितले तसेच चारा डेपो त्वरित सुरू व्हावा.दुष्काळी उपाययोजना कायदा व्हावा व इतर मागण्या संदर्भात आम आदमी पार्टीचे वाल्हे येथील साखळी उपोषणाचा आज चौथा दिवस. निरा-शिवतक्रार तसेच हरणी गावातून देखील शेतकरी बांधवांनी सहभाग घेतला आहे. आज उपोषण करते वाल्हे गावचे राजन पवार, पुरंदर तालुका आप युवाअध्यक्ष महेश अर्जुनराव जेधे,निरा-कोळवीरे जिल्हा परिषद गण आप चे अध्यक्ष विलास भालचंद्र जेधे आणि जिल्हा परिषद गण चे युवाअध्यक्ष संतोष रामचंद्र ताकवले तसेच अनेक वाल्हे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते जर सोमवार पर्यंत सर्व मागण्या पूर्ण नाही केल्या तर ६ रोजी पुणे - पंढरपूर रास्ता रोको करण्यात येणार आहे.