बक्षीस पात्र विद्यार्थ्यांकडून प्रेरणा घेत अधिकाधिक सहभाग घ्यावा व बक्षीस मिळवावी-ॲड.अशोक प्रभुणे..
विद्या प्रतिष्ठानमध्ये विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संपन्न
सोमेश्वरनगर- बारामती तालुक्यातील
विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज सीबीएससी सोमेश्वर नगर येथे वार्षिक बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे उपस्थित होते.यावेळी शाळेत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा तसेच इतर शाळांमध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात स्वरांधरा संगीत मंचातील मुलांच्या शास्त्रीय यमन रागातील बंदिश गायनाने झाली. त्यानंतर शाळेतील नृत्यछंद वर्गातील मुलींनी शास्त्रीय नृत्य सादर केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात अशोक प्रभुणे सरांनी सर्व बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन तर केलेच परंतु इतरही मुलांनी बक्षीस पात्र विद्यार्थ्यांकडून प्रेरणा घेऊन अधिकाधिक सहभाग घ्यावा व बक्षीस मिळवावी यासाठी प्रेरित केले.
सदर कार्यक्रमाचे नियोजन व संचलन शाळेतील बक्षीस वितरण समितीच्या प्रमुख रेश्मा गावडे व सहकाऱ्यांनी केले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सचिन पाठक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.