Type Here to Get Search Results !

सुपा पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी... दरोडा टाकण्याचे तयारीत असलेला सराईत टोळीचा मोरक्या ताब्यात.... सांगवी बारामती, मिरजगांव, बेलवडी (अहमदनगर ) फलटण इत्यादी ठिकाणी केलेले गुन्हे उघड

सुपा पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी... दरोडा टाकण्याचे तयारीत असलेला सराईत टोळीचा मोरक्या ताब्यात 

सांगवी बारामती, मिरजगांव, बेलवडी (अहमदनगर ) फलटण इत्यादी ठिकाणी केलेले गुन्हे उघड

सोमेश्वरनगर : - दरोडा टाकण्याचे तयारीत असलेला सराईत टोळीचा मोरक्या ताब्यात घेवुन एक गावठी पिस्टल दरोडयाचे साहित्य, २ पिकअपसह १२,९६,१००/- कि चा मुद्देमाल केला हस्तगत – स्थानिक गुन्हे अन्वेशण शाखा व सुपा पोलीस स्टेशन पुणे ग्रामीणची कारवाई दिनांक १०/०२/२०२४ रोजी सुपा पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील व पथक हे रात्रगस्तकामी रवाना झाले असताना रात्रगस्त दरम्यान त्याना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सुपा पोलीस स्टेशन हद्दीत सुपे गावामध्ये एक पांढरे रंगाची होंडा कंपनीची अमेझ चारचाकी गाडी संशयितरित्या फिरत आहे अशी बातमी मिळालेने सहा. पोलीस निरीक्षक पाटील व त्याचे सोबतचा स्टाप व पोलीस स्टेशनकडुन बोलावुन घेतलेला स्टाप असे मिळुन संशयित होन्डा अमेझ कारला सासवड चौक सुपा येथे हात दाखवुन थांबविली असता त्या गाडीमध्ये चार पुरूष व एक महिला तोंडाला रूमाल बांधलेले दिसुन आले. सदर संशयित कारची तपासणी करीत असताना कार मधील चालकांचे बाजुस असलेले शीटवरील इसमांस खाली उतरावुन विचारपुस करीत असताना कार मधील चालकाने एक लोखंडी ऍडजेस्टेबल पाना कार मधुन बाहेर टाकुन गाडी चालु करून मोरगावचे दिशेने पळुन गेला. गाडीतुन उतरवलेले इसमांस त्याचे नांव गाव विचारले असता त्याने त्याचे नांव गणेश चंद्रभान गायकवाड रा. खांडगाव ता. संगमनेर जि. अहमदनगर असे
असल्याचे सांगितले. त्याचे अंगझडती घेतली असता सदर इसमाचे कमरेस एक गावठी पिस्टल, पॅन्टचे
खिशामध्ये एक मोबाईल प्लॅस्टीक पिशवीमध्ये मिरचीची पावडर मिळुन आली. तसेच गाडीतील इतर
इसमाबाबत विचारपुस केली असता त्याने त्यांची नांवे १) अजित अरूण ठोसर २) गोविंद शिरसाठ दोन्ही रा.मातकुळी ता. आष्टी जि. बीड ३) सिमा रावसाहेब गायकवाड रा. बस स्टॅन्ड पाठीमागे फर्निचर दुकान जवळ जालना ४) एक अजित ठोसर याचा मित्र नाव पत्ता माहित नाही असे असल्याचे सांगितले. ही सर्व टोळी दरोडा टाकण्याचे उद्देशाने तयारीने आले असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे विरूध्द सुपा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नंबर ६२/२०२४ भादवि कलम ३९९, ४०९, ४०२ सह शस्त्र अधिनियम कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचे तपास मा. पंकज देशमुख सो, पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली तपास करीत असताना अटक आरोपी व त्याचे इतर साथीदार यानी सांगवी बारामती, मिरजगांव, बेलवडी (अहमदनगर ) फलटण इत्यादी ठिकाणी चारचाकी वाहने चोरल्याचे निष्पन्न झाले. अटक आरोपी याचेकडुन तपासात गावठी पिस्टल ०१ नग, मिरची पावडर, ऍडजेटेबल पाना ०१ नग, मोबाईल ०१ नग, एकुण ४
पिकअप (त्यातील दोन पिकअप सुस्थितीत २ पिकअपचे कट केलेले वेगवेगळे भाग ), गॅस पाईप सह वाहने कट करण्याचे ग्लॅन्डर ०१ नग असा एकुण कि. रू १२,९६,१०० /- रूपयाचा माल हस्तगत करण्यात आला असुन १) माळेगाव पोलीस स्टेशन गु.र.नं ४२ / २०२४ भा.द.वि कलम ३७९ २) मिरजगाव पोलीस स्टेशन गु. र.नं ४६ / २०२४ भा.द.वि कलम ३७९ ३) बेलवडी पोलीस स्टेशन गु.र.नं ५४ / २०२४ भा.द.वि कलम ३७९
हे गुन्हे व फलटण, सटाणा इत्यादी ठिकाणी घटना केलेचे उघडकीस आणण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी ही मा.पंकज देशमुख सो, पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण, मा. संजय जाधव सो अप्पर
पोलीस अधिक्षक बारामती विभाग, मा. सुदर्शन राठोड साो, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग, स्थानिक गुन्हे शाखाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर सो यांचे मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक  नागनाथ पाटील साो, स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस उपनिरीक्षक अमित सिद
पाटील, पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी, पोलीस अमंलदार बाळासाहेब कारंडे, रविराज कोकरे, अजय घुले, राहुल भाग्यवंत, रूपेश साळुके, संदिप लोंढे, महादेव साळुके, किसन ताडगे, निहाल वनवे होमगार्ड खोमणे,भोसले यांनी केली आहे.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test