वाघळवाडी येथे 'एकल' महिलांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम संपन्न.
सोमेश्वरनगर वार्ताहर
बारामती तालुक्यातील वाघळवाडी-सोमेश्वरनगर येथे 'एकल' महिलांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
'विधवा ' हा शब्द स्त्रियांची वेगळी ओळख करून देत होता. याच महिलांसाठी काही ठिकाणी 'एकल' तर काही ठिकाणी 'पूर्णांगिनी' असे संबोधने ठेवण्यात आलेले आहेत. कोणतेही धार्मिक कार्य ,समारंभ, उत्सवात या एकल महिलांना सुद्धा तितकाच सन्मान दिला पाहिजे .अशी भूमिका व्यक्त करणाऱ्या सुजाता हंगीरे यांना संध्या भुजबळ, मनीषा जाधव , आशा हंगीरे , मुक्ता शिंदे ,यांनी सुद्धा मोलाची साथ दिली. या विधवा भगिनींना पूर्णांगिनी किंवा 'एकल' महिला असे संबोधत प्रत्येक धार्मिक कार्यात स्थान देऊन सहभागी करून घेतले पाहिजे. प्रत्येक समारंभात सहभागी होण्याचा तिलाही तितकाच अधिकार आहे म्हणूनच , गावातील बाकीच्या महिलांबरोबर या स्त्रियांनाही हळदीकुंकू कार्यक्रमात वाण देऊन सहभागी करण्यात आले होते. या समारंभाच्या माध्यमातून या एकल स्त्रियांकडे बघण्याची समाजातील लोकांची मानसिकता बदलली पाहिजे व सामाजिक बांधिलकी असा नवा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे या कार्यक्रमासाठी रोहिणी सावंत, लता सावंत ,दिपाली गायकवाड, लाजवंती मांढरे, मुक्ता भुजबळ, गावातील इतर व परिसरातील सर्व महिला उपस्थित होत्या. विविध विषयावर विचारविनिमय व्हावा व रोजच्या जीवनातून विरंगुळा म्हणून मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होत्या.