Type Here to Get Search Results !

मु. सा. काकडे महाविद्यालयात'निर्भय कन्या अभियान' अंतर्गत व्याख्यान आणि स्वसंरक्षण कराटे प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न.

मु. सा. काकडे महाविद्यालयात'निर्भय कन्या अभियान' अंतर्गत व्याख्यान आणि स्वसंरक्षण कराटे प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी           
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ आणि मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर( ता बारामती ) विद्यार्थी विकास मंडळ, अंतर्गत गुणवत्ता सुधार कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनींसाठी 'निर्भय कन्या योजना' अंतर्गत व्याख्यान आणि स्वसंरक्षण कराटे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार दि. 13 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन सकाळी 10.15 वा. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवीदास वायदंडे व उपस्थित वक्ते '- डॉ. मनोती तळवलकर (तळवलकर हॉस्पिटल, निरा), ॲड. तृप्ती देवकर, (ऍडव्होकेट, बारामती), अमृता भोईटे (निर्भया पथक प्रमुख, पुणे शहर व बारामती तालुका) निखील नाटकर (कराटे प्रशिक्षक) यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य व उपक्रमाचे  समन्वयक, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. जगन्नाथ साळवे यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि मनोगत व्यक्त केले. जग वेगाने पुढे जात असल्याने त्यासोबत ताळमेळ बसवणे गरजेचे बनले आहे. विद्यार्थिनींच्या बदलाच्या वयावरील तीन आवश्यक टप्प्यांवर लक्ष देणे गरजेचे असून बदलत्या जीवनशैलीतून निर्माण झालेला चुकीचा आहार, ताण तणाव, याचे आरोग्यवर होणारे परिणाम विपरीत दिसत आहेत कायद्याचा वापर करताना त्याचे फायदे तोटे जाणून घेऊन कायद्याचा प्रतिबंधात्मक वापर व्हायला हवा असे मत त्यांनी व्यक्त केले. मोबाईल हे ज्ञानाचे नाही तर माहितीचे साधन आहे परंतु त्याच्या अतिवापरामुळे सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याचे सांगितले. महाविद्यालय हे एक कुटुंब असून विद्यार्थिनींच्या समस्या जाणून घेऊन उपाययोजना केली जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विद्यार्थिनींनी भयभीत न होता स्वसंरक्षणाचे धडे घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. उद्घाटन सत्राचे आभार उपप्राचार्य डॉ. जया कदम यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग  डॉ. निलेश आढाव, प्रा. आदिनाथ लोंढे, आय क्यू एसी चे समन्वयक डॉ. संजू जाधव, प्रा. पूजा काकडे, प्रा. चेतना तावरे, प्रा. नीलिमा निगडे, प्रा. निशा शिंदे, प्रा. प्राजक्ता शिंदे, प्रा. मेघा जगताप, प्रा. रेश्मा पोकळे, प्रा. स्नेहा होळकर, प्रा. मेघा काकडे, प्रा. पूजा ढोणे, प्रा . निकाळजे उपस्थित होते. 
उद्घाटन समारंभानंतर प्रथम सत्रामध्ये डॉ. मनोती तळवलकर यांनी 'महिलांचे आरोग्य व घ्यावयाची काळजी' या विषयावर बोलत असताना स्त्रीला निसर्गाने दिलेले वरदान म्हणजे तिचे शरीर असून त्याची योग्य काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे असे सांगितले. आपले शरीर हे सुयोग्य आहार, व्यायाम झोप आणि मानसिक स्वास्थ्य या चार आधार स्तंभावर  अवलंबून आहे. जीवनशैली बदलल्यामुळे वेगवेगळ्या अडचणी निर्माण होताना दिसतात. व्यायामाचा अभाव चुकीची आहार पद्धती जंग पुढचे अति प्रमाणात सेवन यामुळे हार्ट अटॅक डायबेटीस कॅन्सर व आयुर्वेदाच्या नावाखाली सगळीकडे वापरली जात असणारी रासायनिक औषधे शरीरावर विपरीत परिणाम करताना दिसतात प्लास्टिकचा वापर आपल्या हार्मोनल संतुलनावर अत्यंत विघातक परिणाम करत असून प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन त्यांनी केले. दैनंदिन धावपळीच्या जीवनात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे असा सल्ला दिला. हिरव्या पालेभाज्या मोड आलेली कडधान्य यांचा आहारात समावेश असावा. जीवनसत्वाच्या अभावामुळेच त्वचा विकार व केसांच्या आरोग्य धोक्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छता, योग्य आहार, योगासन, व्यायाम, ताणतणावाचे व्यवस्थापन करणे या गोष्टी तुम्हाला सदृढ बनवतील असे प्रतिपादन केले. या नंतर ॲड. तृप्ती देवकर यांनी 'स्त्रियांचे कायदे आणि संरक्षण' या विषयावर मार्गदर्शन केले. संविधानामध्ये महिलांसाठी हक्क दिलेले अजूनही आज स्त्री ही आईच्या गर्भातही सुरक्षित नसलेली दिसून येते. कायद्यान बद्दलची बद्दलचे अज्ञान दूर होण्याच्या दृष्टीने महिलांसाठी केलेले कायदे, तिच्या संरक्षणासाठी केलेले कायदे जाणून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. कायद्याचे ज्ञान नसल्याने अन्याय सहन केला जातो. लोक काय म्हणतील? या भीतीने विरोध केला जात नाही. विवाहपूर्व व विवाह नंतर स्त्रियांसंदर्भात असणारे कायदे, त्या कायद्यांचा वापर, फायदे-तोटे यावर त्यांनी प्रकाश टाकला. तसेच स्त्रियांनी दिल्या गेलेल्या कायद्याचा गैरवापर करू नये असेही मत व्यक्त केले. 
यानंतर निर्भया पथक प्रमुख पोलीस कॉन्स्टेबल अमृता भोईटे यांनी निर्भया पथकाचे ध्येय आणि उद्दिष्टे सांगत असताना मुलींच्या मनामनात पोहोचणे आणि त्यांना बोलते करणे हाच हेतू असल्याचे सांगितले. समाजामध्ये वावरताना होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तक्रार कुठे द्यायची? कशी द्यायची? कोणत्या  कलमा खाली द्यायची यावर चर्चा केली.घडणाऱ्या विविध विघातक घटनांना प्रतिबंध हाच उपाय असून कान व डोळे उघडे ठेवण्याची गरज आहे, आपल्याला काय करायचे? ही वृत्ती सोडावी लागेल असे सुचविले.सध्या इन्स्टा, फेसबुक, व्हाट्सअप, इंटरनेट, ई-मेल यावरून त्रास देण्याचे प्रकार वाढत आहेत. काल्पनिक व आभासी जगातून बाहेर पडावे. स्वतः सुरक्षित अंतर ठेवावे. गुड टच-बॅड टच ही संकल्पना समजावून घ्यावी आणि कोणत्याही प्रसंगी आई-वडिलांना विश्वासात घेऊनच कुठलेही पाऊल उचलावे असे त्यांनी सांगितले. कोणत्याही प्रसंगी आत्महत्या हा पर्याय असूच शकत नाही असे प्रतिपादन त्यांनी केले.विद्यार्थिनींना कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास निर्भया टोल फ्री क्रमांक 112 वरती संपर्क क्रमांक संपर्क करण्याचे आवाहन केले. 
दुसऱ्या सत्रामध्ये निखील नाटकर यांनी 'स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण, या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी स्वतःच्या संरक्षणासाठी तयार राहायला हवे, मनातील भीती काढून जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी सक्षम व्हायला हवे, कोणत्याही छेडछाडीकडे  डोळेझाक न करता विद्यार्थिनींनी निर्भयपणे त्याचा प्रतिकार करायला हवा असा सल्ला त्यांनी आपल्या प्रशिक्षणादरम्यान दिला. प्रशिक्षणामध्ये विद्यार्थिनींना स्वसंरक्षणासाठी वेगवेगळ्या कराटेच्या ट्रिक्स शिकवल्या गेल्या. स्वसंरक्षण प्रशिक्षणातूनच आपण सर्वजणी निर्भय होऊ शकाल असे प्रतिपादन त्यांनी केले.
शेवटी उपस्थित विद्यार्थिनींसाठी प्रश्न व  उत्तरा साठी सत्र खुले करण्यात आले. यामध्ये विद्यार्थीनींनी आपले प्रश्न विचारले व वक्त्यांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. उपस्थित विद्यार्थिनींनीमध्ये तृतीय वर्ष कला ची विद्यार्थिनी शीतल किर्वे, द्वितीय वर्ष बी.एस.सी.ची विद्यार्थिनी जाधव ऋतुजा, प्रथम वर्ष बी.ए.ची विद्यार्थीनी गौरी धोंगडे या विद्यार्थिनींनी प्रतिनिधिक मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील एकूण 125 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कल्याणी जगताप यांनी केले तर प्रा. नीलम देवकाते यांनी आभार व्यक्त केले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवीदास वायदंडे यांचे मार्गदर्शन लाभले. ही कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test