श्री सोमेश्वर सह.साखर कारखाना व्हा.चेअरमन पदी पुरंदर येथील बाळासाहेब कामथे यांची निवड
सोमेश्वरनगर - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारसॊ यांचे सूचनेनुसार शुक्रवार दि.२ रोजी असलेल्या मासिक मिटिंग दरम्यान बारामती तालुक्यातील श्री.सोमेश्वर सह साखर कारखानाचे व्हाईस चेअरमनपदी पुरंदर तालुक्यातील खळद येथील बाळासाहेब ज्ञानदेव कामथे यांची निवड बिनविरोध करण्यात आली , पहिल्या व्हाईस चेअरमन प्रणिता खोमणे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त पदी त्यांचे नांव बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी जाहीर केले.
यावेळी कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप, मावळते व्हाईस चेअरमन प्रणिता खोमणे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, माजी चेअरमन व विद्यमान जेष्ठ संचालक राजवर्धन शिंदे व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.