करंजेत "जय भवानी, जय शिवाजी"च्या जयघोषात शिवजयंती साजरी
सोमेश्वरनगर - शिवाजी महाराज यांचे पावडे , गीत शिवप्रेमींचा अपूर्व उत्साह आणि "जय भवानी, जय शिवाजी...” च्या जयघोषात बारामती तील करंजेत शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी करंजेतील मुख्य चौकात शिवाजी महाराज मूर्ती व शिवप्रेमींनी सिंहगड किल्ले येथे जात शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करत आणलेल्या जोतिस अभिवादन केले गावातील मुलींनी नऊवारी साडी नेसत पारंपारिक वेशभूषा जपली " जय भवानी, जय शिवाजी...” असे म्हणत सजवलेल्या पालखीत शिवाजी महाराजांची मूर्तीची संपूर्ण मिरवणूक काढली तसेच प्रत्येक घरा समोर आलेल्या या भव्य मिरवणुकीचे स्वागत केले तसेच महिलांनी शिवमुर्ती ची पूजा करत मानाचा मुजरा केला.करंजे हे अठरापगड जाती धर्माचे गावं आहे येथे सर्वच महापुरुषांचे उत्सव मिरवणूक मोठ्या थाटात सर्व युवक वर्ग एकत्र येत केली जाते त्यामुळे करंजे गावचे परिसरातून नेहमीच कौतुक होत असते