जुन्या आठवणींना उजाळा देत... त्या आठवणीत रंगला माजी विद्यार्थी स्नेह मेळावा
न्यू इंग्लिश स्कूल खलाटेवस्ती,लाटे या शाळेमध्ये सण २०००-२००१ या वर्षीच्या माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न
बारामती प्रतिनिधी
"आवडते मज मनापासुनी शाळा", "लाविते लळा जशी माऊली बाळा"..!
शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलांनंतर
संस्काराची शिदोरी आणि उज्ज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या शाळेच्या आठवणी आयुष्यात कधीही विसरल्या जात नाहीत
हे सत्य आहे. याच पार्श्वभूमीर बारामतीतील न्यू इंग्लिश स्कूल खलाटेवस्ती, लाटे या शाळेमध्ये सण २०००-२००१ या वर्षां शिकत असलेले माजी विद्यार्थी पुन्हा एकत्र आले. नुकतेच या स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते.
अनेक विद्यार्थी जवळजवळ २३ वर्षांनंतर एकमेकांना भेटले. त्यामुळे अनेक शाळेतील जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला. अनेकांना आपले शाळेचे जुने मित्र-मैत्रिणी भेटल्यामुळे चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता
या स्नेह मेळाव्या प्रसंगी माजी विद्यार्थी एकत्र येत त्यांनी शाळेतील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी सुरक्षिततेसाठी संरक्षण भिंतचा येणारा खर्च यावेळी त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक गिरमे सर यांच्याकडे सुपूर्त केला यावेळी कुलदीप चंद्रकांत खलाटे यांनी २५,०००/-₹ तर अमित सुभाष शिंदे,मिलिंद जयवंत सणस यांनी पाच हजार रुपये व इतर माजी विद्यार्थी भाग्यश्री लालासो सूर्यवंशी ,निर्मला खलाटे ,सारिका भानुदास नवले, मनीषा शिंदे ऋषिकेश पन्हाळे ,विकास मोहिते ,सागर नाळे ,वहिदा पठाण अभिजीत खलाटे ,असिफ तांबोळी,सुधीर पिंगळे, विक्रम थोपटे ,जावेद तांबोळी, श्रीकांत खराटे, नितीन वाघमारे, सागर बनकर ,अजित काशीद ,महेश पिंगळे ,हेमा खलाटे, शितल खलाटे ,तृप्ती मोहिते ,सुचित खलाटे ,रमेश काळंगे इत्यादी सर्व मिळून तब्बल ५१ हजार रुपये देणगी देत त्यांनी एक सामाजिक उपक्रम राबवत माजी विद्यार्थ्यांनी स्नेहमेळावा साजरा केल्याने शाळेकडून कौतुक होत आहे , भविष्यात असेच आम्ही माजी विद्यार्थी एकत्रित विविध उपक्रम राबवत स्नेह मेळावा भरवणार असल्याचेही उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी बोलताना सांगितले.