Type Here to Get Search Results !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तालुका स्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त  तालुका स्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १६ वर्षा आतिल तालुका स्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा निफाड येथील सरस्वती विद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात संपन्न

टेनिस क्रिकेट असोसिएशन नाशिक व निफाड तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त16 वर्षाआतिल तालुका स्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा निफाड येथील सरस्वती विद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाली त्यामध्ये क्रीडा सह्याद्रीला प्रथम क्रमांक , द्वितीय क्रमांक इलेव्हन
 स्टार  निफाड यांनी मिळवला या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव श्रीमती मीनाक्षी गिरी ,निफाड इंग्लिश स्कूलचे चेअरमन नंदलालजी चोरडिया ,नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन सचिव व  क्रीडा सह्याद्री फाउंडेशन नाशिक अध्यक्ष विलास गायकवाड ,क्रीडा सह्याद्री सदस्य रोहन राऊत, संग्राम सानप,रमेश वडघुले, माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य सचिव विनोद गायकवाड , उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष राहुल कुलकर्णी, राष्ट्रीय खेळाडू प्रतीक्षा कोतकर इत्यादी उपस्थित होते
या तालुका स्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी  तेरा  संघानी सहभाग नोंदवला  या तालुकास्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी सुरभी पैठणी (टेक्सटाइल मार्केट), विंचूर व संग्राम सानप यांच्या यांच्याकडून तीन हजार रुपये ,द्वितीय पारितोषिक विशाल फर्निचर व स्व स्वातंत्र्यसैनिक बा. य. गुरुजी यांच्या स्मरणार्थ  दोन हजार रुपये व माहिती अधिकार व पत्रकर संरक्षण समिती उत्तर महाराष्ट्र राहुल कुलकर्णी यांच्याकडून प्रथम व द्वितीय चषक देण्यात आला.
या स्पर्धेचा अंतिम सामना क्रीडा सह्याद्री विरुद्ध इलेव्हन स्टार निफाड यांच्यात झाला क्रीडा सह्याद्रीच्या खेळाडू उत्कृष्ट खेळ करत संघाला विजयश्री मिळवून दिला व इलेव्हन स्टार हा संघ उपविजेय झाला किडा सह्याद्रीने या संघाने प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी, माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण उपाध्यक्ष राहुल कुलकर्णी, क्रीडा सह्याद्री अध्यक्ष विलास गायकवाड ,विनोद गायकवाड,रोशन राऊत ,चेतन कुंदे,रमेश वडघुले यांनी अभिनंदन केले पंच म्हणून प्रतीक्षा कोटकर ,सुमेध बोधाडे ,ओम पवार आदित्य त्यांनी काम बघितले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test