बारामती ! धनगर सोशल ऑर्गनायझेशनच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त "जागतिक स्वाभिमान दिन" साजरा होणार
बारामती प्रतिनिधी - धनगर सोशल ऑर्गनायझेशनच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त रविवार दिनांक ४ फेब्रुवारी २०२४ रोजी रयत भवन बारामती येथे धनगर समाज बांधवांचा पहिला जागतिक स्वाभिमान दिन साजरा होत आहे.
सकाळी ११ते ४ वाजेपर्यंत साजऱ्या होणाऱ्या जागतिक स्वाभिमान दिन उद्घाटन सोहळ्यास भूषणसिंहराजे होळकर उपस्थित राहणार आहेत. धनगर समाजातील सर्व क्षेत्रातील नेते आणि महाराष्ट्रातील सर्व समाज बांधव यांनी याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन चे संस्थापक अध्यक्ष अध्यक्ष बबनराव आटोळे, सचिव प्रा.अजय गाढवे, कार्याध्यक्ष व्यंकटेश चामनर, सल्लागार समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे, रघुनाथ कुवर, विशाल पोळ, राष्ट्रीय प्रवक्ते सखाराम खोत, पोपटराव पवार, विजय देवकाते, खंडू तात्या तांबडे, रणजित धायगुडे, उषाताई खर्चे, रंजना कोळेकर, सुनंदा गडदे, प्रदेशाध्यक्ष महादेव सातपुते, तसेच विभागीय अध्यक्ष,जिल्हा अध्यक्ष,तालुका अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांनी केलेले आहे.
याप्रसंगी आरक्षण लढ्यामध्ये सामील झालेल्या आणि समाजातील वेगवेगळ्या श्रेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या समाज बांधवांचा सत्कार होणार आहे.
समाजाच्या वेगवेगळ्या विषयांवर मान्यवर मंडळी आपले मनोगत आणि खुली चर्चा करणार आहेत. तरी सर्व महाराष्ट्रातील धनगर बांधव आणि महिला भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन धनगर सोशल ऑर्गनायझेशन वतीने करण्यात आलेले आहे.