Type Here to Get Search Results !

शिवसाई पतसंस्था शुभारंभ व कार्यालयाचे उद्घाटन समारंभ संपन्न

शिवसाई पतसंस्था शुभारंभ व कार्यालयाचे उद्घाटन समारंभ संपन्न
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर वाघळवाडी  शिवसाई पतसंस्था शुभारंभ व कार्यालय उद्घाटन समारंभ बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या हस्ते पार पडला.
 या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप होते. प्रमुख उपस्थितीमध्ये बारामती तालुका सहकारी संस्था सहाय्यक निबंधक मिलिंद टांकसाळे, सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक शैलेश रासकर, ऋषिकेश गायकवाड ,कृष्णाई पतसंस्थेचे चेअरमन सुनील भोसले, पतसंस्थेचे मार्गदर्शक व वाघळवाडी वि का  सोसायटीचे चेअरमन सतीश सकुंडे उपस्थित होते*

 उपस्थित मान्यवरांचे स्वागत शिवसाई पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन तुषार सकुंडे व व्हा.चेअरमन समीर जाधव यांनी केले प्रथम पाच ठेवीदारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

शिवसाई पतसंस्थेचे संस्थापक/ चेअरमन तुषार सकुंडे यांनी संस्था स्थापन करण्यामागचे उद्दिष्टे असे आहे की सभासद ठेवीदारांचे हित जपणे असून समाजामध्ये सभासदांचे सामाजिक व आर्थिक प्रगती साधने व सदर प्रगती सहकाराच्या तत्त्वानुसार स्वतःसाठी व एकमेकांसाठी मदतीचे साधन आहे.

या कार्यक्रमाला सोमेश्वर पंचक्रोशी मधील विविध गावचे आजी-माजी सरपंच उपसरपंच सदस्य, इतर संस्थांचे पदाधिकारी वाघळवाडी चे ग्रामस्थ, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसाई पतसंस्थेचे संचालक जालिंदर सावंत, आदिनाथ जगताप, गणेश चव्हाण, निखिल जगताप, सागर चव्हाण, अक्षय सावंत, प्रियांका सकुंडे, वर्षा सावंत सचिव व खजिनदार केदार सकुंडे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test