Type Here to Get Search Results !

● एवढा गेटकेन ऊस गाळपास आणल्....● ऊस तोड विलंबाने दुबार पिक बुडलेले शेतकऱ्यांचा टाहो...● संचालक मंडळास व एम.डी. यांना नारळ देत शेतकरी कृती समिती करणार सत्कार..● उद्या शनिवारचा कार्यक्रम फिक्स...● जाब विचारण्यासाठी सर्वसभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे-सतीशराव काकडे

● एवढा गेटकेन ऊस गाळपास आणल्....● ऊस तोड विलंबाने दुबार पिक बुडलेले शेतकऱ्यांचा टाहो...● संचालक मंडळास व एम.डी. यांना नारळ देत शेतकरी कृती समिती करणार सत्कार..● उद्या शनिवारचा कार्यक्रम फिक्स...

● जाब विचारण्यासाठी सर्व
सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे-सतीशराव काकडे
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
श्री सोमेश्वर साखर कारखान्यावर शनिवार दि ३/२/२०२४ रोजी सकाळी ११ वा. संचालक मंडळाने अग्रक्रमाने सभासदांच्या ऊस तोडीस प्राधान्य दिल्याने संचालक मंडळास व एम.डी. यांना नारळ देणार -  सतिशराव काकडे

ऊस तोडीचे चोख नियोजन करून सभासदांची कपडे काढल्या बद्दल जाब विचारण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे शेतकरी कृती समितीचे आवाहन....श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा सन २०२३-२४ चा गाळप हंगाम सुरू होवुन कारखान्याने ९० दिवसांमध्ये जवळपास ८ लाख १७ हजार मे. टन गाळप पुर्ण केलेले आहे. त्यापैकी
कारखान्याने १ लाख ९० हजार मे.टन एवढा गेटकेन ऊस गाळपास आणल्याचे समजते त्यापैकी
सभासदांचा फक्त ६ लाख २७ हजार मे.टन उसाचे गाळप केलेले आहे. कारखान्याने गेटकेन उस
तात्काळ बंद करून कारखान्याच्या परिपत्रकानुसार सभासदांची ऊस तोड व्हावी यासाठी कृती समितीने
समक्ष भेटुन निवेदन देवुन जाब विचारला होता. तरीही कारखान्याने गेटकेन ऊस अद्यापपर्यंत बंद केलेला नाही. तरी दि.१/२/२०२४ रोजी देखील कारखान्यास याबाबत निवेदन दिलेले आहे.
गेल्या वर्षी सोमेश्वर कारखान्याने १२ लाख ५६ हजार मे.टन गाळप केले होते. चालु वर्षी प्रचंड दुष्काळी परिस्थिती आहे. असे असतानाही सोमेश्वर कारखान्याने आज अखेर सुमारे ८ लाख १७ हजार मे.टन गाळप केले असुन सभासदांचा हक्काचा ६ ते ७ लाख मे.टन उस शिल्लक आहे. म्हणजेच या वर्षी सुमारे १३ ते १४ लाख मे. टनांच्या आसपास गाळप होणार आहे. म्हणजेच मागील वर्षापेक्षा सुमारे दोन लाख मे.टन गाळप जादा होणार आहे. यामध्ये गेटकेन धारकांचा कमी रिकव्हरीचा
ऊस गाळप करून त्यांना सभासदांच्या एवढा भाव देवुन चेअरमन यांना कोणाचे हित साधायचे आहे.
वास्तविक गेटकेन उसाचे गाळप करून सभासदांच्या उसाची वेळेत उस तोड न झाल्याने टनेज प्रती
एकरी ८ ते १० मे.टन कमी झालेले आहे. तसेच ऊस तोड विलंबाने झाल्याने दुबार पिक सुध्दा
बुडलेले आहे असे दुहेरी नुकसान चेअरमन यांनी सभासदांचे का केले? याचा जाब विचारण्यासाठी सर्व
सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
संचालक मंडळाने आजपर्यंत उस तोडीचे नियोजन हे परिपत्रकाप्रमाणे केलेले आहे. या वर्षी
परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याचे काम कार्यकारी संचालक यांचे होते. यामध्ये त्यांनी दुर्लक्ष
केल्याने त्यांनी सभासदांचे आर्थिक नुकसान केलेले आहे. त्यामुळे त्यांना प्रथम तमाम उस उत्पादक
शेतकऱ्यांच्याकडून नारळ देण्याचा कार्यक्रम होणार आहे. तरी चेअरमन व संचालक मंडळास जाब
विचारण्यासाठी शेतकरी कृती समिती व तमाम उस उत्पादक सभासद शनिवार दि. ३/२/२०२४ रोजी
सकाळी ११.०० ते १२.०० दरम्यान कारखाना कार्यस्थळावर आपली भेट घेण्यासाठी येणार असुन
आपली वेळ राखीव ठेवावी. चालु वर्षी दुष्काळामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील कारखान्यांचे गाळप कमी
होणार आहे. सोमेश्वर कारखान्याचे मागील वर्षी १२ लाख ५६ हजार मे.टन गाळप झाले होते. परंतु
यावर्षी सोमेश्वरचे गाळप १४ लाख मे. टनाच्या आसपास होईल असे दिसते म्हणजेच दुष्काळ असुनही एक ते दिड लाख मे.टन गाळप जादा होणार आहे. म्हणुन कृती समिती व सभासदांच्या वतीने
चेअरमन व संचालक मंडळ यांचाही नारळ देवून सभासदांची कपडे फेडल्याबद्दल सत्कार व जाब
विचारला जाणार आहे. तरी सभासदांनो घरी बसुन किंवा मला फोन करून तुम्हाला न्याय मिळणार
नाही. हे सर्व सभासदांनी समजून घ्यावे ही विनंती.


वास्तविक माझा वैयक्तिक १५/६ ८६०३२ उस बहुतांश गाळप झालेला आहे. शेतकरी
कृती समितीच्या वतीने तमाम उस उत्पादक सभासदांच्या न्याय हक्कांसाठी शनिवार दि. ३/२/२०२४ रोजी
जाब विचारण्यासाठी मोठ्या संख्येने सभासद उपस्थित राहिले नाहीत. तर सभासदांचेच नुकसान होणार आहे.
सभासद बहुसंख्येने उपस्थित न राहिल्यास भविष्यात शेतकरी कृती समितीस नाईलाजास्तव वेगळा निर्णय
घ्यावा लागेल याची नोंद सभासदांनी घ्यावी. विद्यमान संचालक मंडळ हे गेटकेन धार्जिन आहे.
सतिशराव शिवाजीराव काकडे 
अध्यक्ष,शेतकरी कृती समिती सोमेश्वरनगर

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test