सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 'जीवनसाधना गौरव पुरस्कार' मु सा काकडे महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतिशराव काकडे-देशमुख यांना जाहीर.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या प्रदीर्घ व उल्लेखनीय योगदानाबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे दिला जाणारा व अत्यंत प्रतिष्ठित मानला जाणारा यावर्षीचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 'जीवनसाधना गौरव पुरस्कार' मु सा महाविद्यालयाचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतिशराव काकडे-देशमुख यांना जाहीर झाला आहे.
सर्वांसाठी ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. मु सा महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, आणि व्यवस्थापन समितीच्या वतीने अध्यक्ष सतिशराव काकडे यांचे अभिनंदन करत शुभेच्छा देण्यात आल्या.
अशी माहिती मु सा काकडे महाविद्यालययाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी दिली.