करंजेपुल माजी सरपंच वैभव गायकवाड व विद्यमान सरपंच पूजा गायकवाड यांचा वाढदिवस निमित्त वृक्षारोपण
सोमेश्वरनगर -बारामती तालुक्यातील आजी माजी सैनिक संघटना सोमेश्वरनगर यांच्या संयुक्त विद्यमाने करंजेपूल गावचे माजी सरपंच वैभव अशोक गायकवाड, नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच पुजाताई वैभव गायकवाड यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत वृक्षारोपण करत आणि केक कापून साजरा करण्यात आला..आजी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी मेजर ताराचंद शेंङकर व उपस्थित मान्यवरांनी शाल श्रीफल देऊन सन्मान केला. यावेळी मेजर ताराचंद शेंङकर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले वैभव यांचा वाढदिवस १ तारीख व पुजाताई यांचा वाढदिवस २ तारीख हा या दाम्पत्याचा योगायोगच..तसेच ग्रामपंचायत आजी माजी पदाधिकारी यांचा वाढदिवस आजी माजी सैनिक संघटना करत आहे हा देखील योगायोग समजावा..दोघांनाही सैनिक संघटनेने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या..तसेच आजी माजी सैनिक संघटनेचे सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे.या प्रसंगी शेंङकरवाङी ग्रामस्थ मंङळींच्या वतीने देखील शाल श्रीफल देऊन दाम्पत्यचा वाढदिवसानिमित्त सन्मान केला.व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर, सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव शेंङकर, सैनिक स्पोर्ट्स ॲकॅङमी अध्यक्ष भाऊसाहेब लकङे,राष्ट्रवादी काँग्रेस युवक उपाध्यक्ष प्रदिप शेंङकर, ग्रामपंचायत सदस्य निखिल शेंङकर,मेजर नितिन शेंङकर,मेजर बाळासाहेब गायकवाड, शैलजा गायकवाड,कांचन गायकवाड,सुवर्णा गायकवाड,माधुरी लकङे उपस्थित होते.