सिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न
बारामती : बुद्ध विहार सिद्धार्थ नगर आमराई बारामती येथे बाल संस्कार वर्गाची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेत परिसरातील मुलांनी सहभाग घेतला .यावेळी पूजापाठाचा कार्यक्रम घेतल्या नंतर लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.येत्या रविवारी स्पर्धेचे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. सदर उपक्रम सिद्धार्थ नगर येथील युवा वर्ग, भारतीय युवा पँथर संघटना,भारतीय बौद्ध महासभा यांनी आयोजित केला होता.
चित्रकला स्पर्धा कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक बारामती नगर परिषद आभिजीत चव्हाण,पी.एस.आय.शुभम शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी भारतीय युवा पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे,संपर्क प्रमुख शुभम गायकवाड,शहर अध्यक्ष निखिलभाई खरात,भारतीय भारतीय बौद्ध महासभा पदाधिकारी अस्मिता शिंदे,सोमनाथ लोंढे उपस्थित होते.तसेच संकेत शिंदे,मिलिंद शिंदे,अनिल गायकवाड,संदीप अहिवळे, दत्ता शिंदे,अक्षय चव्हाण,सागर अहिवळे,आश्विन अहिवळे,प्रेम मोरे,निलेश रणदिवे, स्वप्निल गायकवाड,प्रवीण सोनवणे,आकाश गायकवाड,सिद्धार्थ नगर येथील युवा वर्ग आणि नागरिक उपस्थित होते.