●शेतकरी कृती समितीच्या वतीने श्री सोमेश्वर कारखान्याने तात्काळ गेटकेन उस तोड बंद करून परिपत्रकानुसार सभासदांची उस तोड सुरू करणे बाबत दिले निवेधन
●सभासदांच्या प्रतिक्षेचा बांध फुटल्यास होणाऱ्या परिणामास कारखान्याचे चेअरमन, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जबाबदार राहणार-सतीश काकडे
सोमेश्वरनगर - श्री सोमेश्वर कारखान्याने तात्काळ गेटकेन उस तोड बंद करून परिपत्रकानुसार सभासदांची उस तोड सुरू करणे बाबत निवेधन शनिवार दि ३ रोजी शेतकरी कृती समितीच्या वतीने अध्यक्ष सतीश काकडे यांनी कारखाना चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांना दिले दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा सन २०२३-२४ चा गाळप हंगाम सुरू होवुन कारखान्याने ९२ दिवसांमध्ये जवळपास ८ लाख ३६ हजार मे. टन गाळप पुर्ण केलेले आहे. त्यापैकी कारखान्याने १ लाख ९३ हजार मे. टन एवढा गेटकेन उस गाळपास आणल्याचे समजते पैकी सभासदांचा फक्त ६ लाख ४३ हजार मे. टन उसाचे गाळप केलेले आहे. कारखान्याने गेटकेन उस तात्काळ बंद करून कारखान्याच्या परिपत्रकानुसार सभासदांची उस तोड व्हावी. यासाठी कृती समितीने समक्ष भेटुन निवेदन देवुन जाब विचारला होता. तरीही कारखान्याने गेटकेन ऊस अद्यापपर्यंत बंद
केलेला नाही. आज सभासदांचा १५/६ ते ३०/६ पर्यंतचा आडसाली ८६०३२ व २६५ उस ४ हजार
एकर म्हणजेच अंदाजे १ लाख ८५ मे. टन एवढा शिल्लक आहे. तसेच कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये
अद्याप ही आडसाली, सुरू व खोडवा असा एकुण ७ लाख २० हजार मे. टन उस शिल्लक आहे.
त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी रोपांच्या लागणी केल्या आहेत की ज्यास कारखाना प्रधान्याने तोड
देणार होता तो सभासदांचा उस आज ही शेतात उभा आहे. तसेच ज्या सभासदांनी गेल्या वर्षी खोडवे राखले त्या उसालाही जवळपास १३ ते १४ महीने झाले आहेत तो उस ही शेतात उभा आहे.
सभासदांच्या उसाचे वेळेत गाळप न झाल्याने सभासदांचे एकरी ८ ते १० मे. टनाचे नुकसान झालेले आहे. तरी कारखान्याचे चेअरमन, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांनी सभासदांच्या प्रतिक्षेचा बांध तुटन्याची वाट न पाहता तात्काळ गेटकेन उसाची संपुर्ण उस तोड बंद करून कारखान्याच्या परिपत्रका नुसार सभासदांची उस तोड सुरू करावी. अन्यथा सभासदांच्या प्रतिक्षेचा बांध तुटल्यास त्याच्या होणाऱ्या परिणामास कारखान्याचे चेअरमन, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जबाबदार राहतील. तरी कृती समितीच्या खालील मागण्यांचा तात्काळ विचार व्हावा.
१) गेटकेन उस तात्काळ बंद करून सभासदांच्या उस तोडीस परिपत्रकानुसार प्राधान्य द्यावे.
२) कारखान्याने जानेवारी ते मार्च पर्यंत तुटणाऱ्या उसास ७५ ते १५० रूपये अनुदान जाहीर केले
आहे. त्यामध्ये बदल करून जानेवारी ते मार्च अखेर तुटणाऱ्या उसास २०० ते ३५० रू प्रती मे.
टन अनुदान जाहीर करावे.
३) सभासदांप्रमाणे गेटकेनधारकांना समान दर देण्याची आडमुठी भुमिका चेअरमन यांनी बदलुन
माळेगाव प्रमाणे सभासदांना न्याय द्यावा.
४) ज्या सभासदांकडुन उसतोड मजुरांनी पैसे घेवुन उस तोड केली त्याची माहीती घेवुन तात्काळ
त्या त्या सभासदांना पैसे परत करावे.
५)ज्या सभासदांची उसतोड जळीत करून झाली आहे. त्याची भरपाई त्या उसतोड करणाऱ्या
टोळींकडुन वसुल करूने तो सभासदांना देण्यात यावे.
६) चिटबॉय यांची दरवर्षी भरती गट बदलून असावी
तरी वरील मागण्या तात्काळ मान्य कराव्यात असे विनंती वजा निवेदन पत्र शेतकरी कृती समिती अध्यक्ष सतीश काकडे सह सर्व ऊस उत्पादक सभासद यांच्या उपस्थितीत श्री सोमेश्वर कारखाना मुख्य कार्यालय येथे चेअरमन व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत देण्यात आले.