करंजेतील माळवाडी येथील सती मालुबाई मंदिर होणार भव्यदिव्य.
सोमेश्वरनगर (वार्ताहर) - बारामती तालुक्यातील सती मालूबाई मंदीर उभारण्याच्या कामाला सुरुवात तसेच पाया भरणी कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाला तसेच करंजेतील माळवाडी येथील सती मालुबाई मंदिर होणार भव्यदिव्य होणार असल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.
या कार्यक्रमास श्री सोमेश्वर साखर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप , करंजे सरपंच भाऊसो हुंबरे,बारामती राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष संभाजी होळकर,सोमेश्वर हाईस चेअरमन प्रणीता खोमणे, सोमेश्वर विद्यमान संचालक नवनाथ उद्योग समूह अध्यक्ष संग्राम सोरटे, संचालक प्रविण कांबळे,किसन तांबे, लक्ष्मण गोफने,ऋषिकेश गायकवाड,सोमेश्वर मा. संचालक रमाकांत गायकवाड,पुणे जि बॅक संचालक बंटी तावरे,सोमेश्वर संचालक लक्ष्मणरा ,करंजे माजी उपसरपंच तथा प्रणाली शिक्षण संस्था संस्थापक अध्यक्ष बुवासाहेब हुंबरे, निरा कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य बाळासाहेब शिंदे,निरा कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य पंकज निलाखे , करंजे तंटामुक्ती अध्यक्ष प्रताप गायकवाड ,आजी माजी सैनिक संघटना अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर सह पदाधिकारी या प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते पायाभरणी करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष संभाजी होळकर यांनी मालूबाई विकास आराखडय़ासाठी चालू कामाचा साठी उपमुख्यंमंत्री अजित पवार यांनी दिङ कोटी भरीव निधी दिला आहे. यामुळे दर्जेदार विकास कामे करण्याचा मानस आहे असे त्यांनी प्रसंगी बोलताना सांगितले तसेच मंदीर शिखर कामासाठी अनेक मान्यवरांनी सहकार्य करणार असे सांगत मंदिर काम हे पारदर्शकपणे व भव्यदिव्य करण्यात येणार असल्याचे सांगितले
यावेळी करंजे गावचे विद्यमान सदस्य विष्णू दगङे यांनी प्रसादाचे आयोजन तर मान्यवरांचे करंजे गावच्या वतीने सरपंच भाऊसाहेब हूंबरे यांनी केले व आभार बाळासाहेब शिंदे व बुवसाहेब हुंबरे यांनी मानले.