Crime news होळ हद्दीतील ढगाई मंदिर मध्ये पुन्हा चोरट्यांचा डल्ला
सोमेश्वरनगर - मिळालेल्या माहितीनुसार
वडगाव निंबाळकर पो स्टे गु.र.नं:-71/2024 भा द वि क 457,380
फिर्यादी :- श्री. केशव धोंडीराम क्षिरसागर वय- 47 व्यवसाय-पुजारी रा.वडगांव निंबाळकर ता.बारामती जि.पुणे मो.नं.-9767546104.
आरोपी :- अज्ञात चोरटा
गुन्हा घडला - दि.28/01/2024 रोजी सायंकाळी 07.00 ते दि.29/01/2024 रोजी सकाळी 07.00 वा चे दरम्यान मौजे होळ ता.बारामती जि.पुणे गावाचे हद्दीतील बंद श्री.ढगाई देवी मंदीरामध्ये
गुन्हायातील गेला माल - 1000/- रूपये महीन्याभरात भाविकांनी दान केलेली अंदाजे रोख रक्कम.
हकिकत :- वर नमुद केले तारीख वेळी व ठिकाणी यातील कोणीतरी अज्ञात चोरट्याने खिडकीचे ग्रील कशाचेतरी सहायाने उचकटुन त्याव्दारे मंदीरामध्ये प्रवेश करुन मंदीरामधील दान पेटीचे कुलुप तोडुन महीन्याभरात भाविकांनी दान केलेली त्यातील अंदाजे 1000/-रु रोख रक्कम फिर्यादीचे संमतीशिवाय कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरी करुन चोरुन नेली आहे वगैरे मजकुरची फिर्याद आलेने सदरचा गुन्हा रजीस्टरी दाखल करण्यात आला असुन गुन्ह्याचा वर्दी रिपोर्ट मा.JMFC कोर्ट बारामती यांचे कोर्टात रवाना करण्यात आला असुन पुढील तपास वडगाव निंबाळकर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई लवटे हे करीत आहेत .