बारामती ! पासिंग आऊट परेड जल्लोषात संपन्न.
बारामती प्रतिनिधी - विद्या प्रतिष्ठानचे न्यू बाल विकास मंदिर, पिंपळी, बारामती या शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची पासिंग आऊट परेड बुधवार दि ३१ जानेवारी रोजी जल्लोषात संपन्न झाली. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्त सुनेत्राताई पवार उपस्थित होत्या. तसेच संस्थेचे सदस्य मा. किरण गुजर, संस्थेचे रजिस्टार मा. कर्नल श्रीश कुंभोज सर, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या प्राचार्या तनुश्री गोरे यांनी केले. त्यानंतर शिस्तबद्ध पद्धतीने परेडचे संचलन झाले. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मेडल देऊन प्रोत्साहित केले. तेव्हा डॉ. दीपक निंबाळकर, सौ. शितल तावरे, गौरी देव या पालकांनी आपल्या मनोगतातून शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन शाळेचे आभार मानले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सुनेत्राताई पवार यांनी "तुम्ही देशासाठी, समाजासाठी काहीतरी सकारात्मक कार्य करा, तुमच्याकडून इतरांना प्रेरणा मिळेल असे आदर्श व्यक्ती बना!" असा बहुमोल संदेश दिला.
स्कूल कॅप्टन वेदान्त तावरे आणि शिवांजली नवले यांनी कॅप्टन पदाची सूत्रे नवनिर्वाचित स्कूल कॅप्टन राजवैभव हुंबे आणि अक्षरा पवार यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका सौ. कविता मदने यांनी आभार प्रदर्शन केले व कार्यक्रमाची सांगता झाली.