वाकी येथे रंगला खेळ पैठणींचा... तळ्यात मळ्यात तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन... महिला वर्गांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सोमेश्वरनगर (वार्ताहर) - मकर संक्रांतीनिमित्त बारामती तील ग्रामपंचायत वाकी वतीने हळदी कुंकू कार्यक्रम व खेळ पैठणीचा कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला सदर स्पर्धेचे उद्घाटन वाकी सरपंच किसन बोडरे ,उपसरपंच इंद्रजित जगताप ,सदस्य व शिक्षक नेते हनुमंतराव जगताप , सुधिर गायकवाड यांच्या शुभहस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण करत झाले.. दिवसभराचा ताण तणाव व कोणत्या ना कोणत्या माध्यमातून यांना आनंद मिळावा हा हेतू मनात ठेवून वाकी ग्रामपंचायत ने सर्व एकत्र येत मकर संक्रांती चे औचित्य साधत हळदी कुंकू कार्यक्रम तसेच सर्वांना खेळाच्या स्वरूपात तळ्यात मळ्यात ,चमचा लिंबू ,संगीत खुर्ची ,फुग्यांचा खेळ व उखाने या स्पर्धा आयोजित केल्या होते .यामध्ये महिला उस्फूर्त सहभागी झाल्या होता .प्रत्येक स्पर्धेत तीन क्रमांक काढण्यात आले.प्रथम क्रमांक पैठणी व ट्राॕफी ,द्वितीय क्रमांक थर्मास व ट्राॕफी ,तृतीय क्रमांक पितळी समई व ट्राॕफी अशी बक्षिससाचे आयोजन आयोजकांनी केले होते असे त्यांनी बोलताना सांगितले
विजयी स्पर्धकांची नावे
■ तळयात मळयात -
सारिका हनुमंत जगताप
सीमा माधव जगताप
अश्विनी नितीन गाडेकर.
■ चमचा लिंबू-
शुभांगी सुखदेव जगताप.
किशोरी गौरव जगताप.
सुजाता दत्तात्रय जगताप.स
■ संगीत खुर्ची -
सुनिता दिलीप गाडे.
पुनम गाडेकर.
वर्षा बाळासो.जगताप..
■ फुगे फनी गेम
सुजाता दत्तात्रय जगताप.
पुनम गाडेकर.
किशोरी जगताप.स्पर्धा
■ उखाणे घेणे
वर्षा बाळासो.जगताप.
उज्वला चंद्रशेखर जगताप.
प्रभाली विकास गाडेकर.
तसेच बक्षिस वितरण पार पाडणेकामी सदस्या शालन विठ्ल जगताप,वर्षाराणी बाळासाहेब जगताप,निकिता अनिल भंडलकर ,कल्पना गोरख जगताप ,सुनिता लक्ष्मण जगताप यांनी खूप सहकार्य केले.तसेच प्रत्येक विजयी स्पर्धकांना ट्राॕफी सुनिता दिलीप गाडे यांच्यावतीने देण्यात आल्या.
या प्रसंगी शोभा हनुमंत जगताप यांच्यावतीने तिळगुळाच्या वडया वाटप सर्वांचे तोंड गोड करण्यात आले व सर्वांना शुभेच्छा दिल्या
मनोगतमध्ये शोभा जगताप म्हणल्या की महिलांचा आत्मविश्वास वाढवावा व महिलांनी प्रत्येक ठिकाणी पुढाकार घेऊन कार्य करावे तसेच उपस्थितांचे आभार मानले.