अभिमानास्पद ! वाशिम जिल्हा सहाय्यक नगररचनाकारपदी शंभुराजे तानाजीराव सोरटे यांची नियुक्ती
सोमेश्वरनगर - वाशिम महापालिका सहाय्यक नगररचनाकारपदी बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील शंभुराजे तानाजीराव सोरटे यांची नियुक्ती झाली आहे.
गेल्या सहा महिन्यांपूर्वी एम पी एस सी मार्फत झालेल्या सरळ सेवेतील परीक्षेतून शंभूराजे सोरटे यांची निवड झाली होती तसेच त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सोरटेवाडी येथे झाले असून डिप्लोमा गवरमेन्ट पुणे शिवाजीनगर तर पुढील शिक्षण बिटेक सिव्हिल VIIT पुणे याठिकाणी झाले.
नियुक्ती बद्दल शंभुराजे तानाजीराव सोरटे यांचे सोमेश्वर पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मार्फत अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.