Type Here to Get Search Results !

अभिमानास्पद ! एक आय आय टी (𝐈𝐈𝐓) चेन्नई येथे एम टेक(𝐌.𝐭𝐞𝐜𝐡) ऐरोस्पेस इंजिनिरिंग करीता सुयोग साळवे यांची निवड.


अभिमानास्पद ! एक आय आय टी (𝐈𝐈𝐓) चेन्नई येथे एम टेक(𝐌.𝐭𝐞𝐜𝐡) ऐरोस्पेस इंजिनिरिंग करीता सुयोग साळवे यांची निवड.
सोमेश्वरनगर - वाघळवाडी (सोमेश्वरनगर) ता.बारामती येथील सुयोग जगन्नाथ साळवे यांची भारतातील नामांकीत व प्रतिष्ठित क्रमांक एक असलेल्या भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मद्रास(IIT) चेन्नई येथे एम टेक (M.tech) ऐरोस्पेस इंजिनिरिंग करीता निवड झाली आहे.
त्याने गावाचे नव्हे तर बारामती तालुक्याचे नाव रोशन केले आहे.कोणतेही क्लासेस न लावता रात्रं दिवस एक करून जिद्दीने आणि चिकाटीने अभ्यास करून त्याने हे यश प्राप्त केले आहे.या यशामागे त्यांचा वडिलांची प्रा.डॉ. जगन्नाथ साळवे यांची खूप मोठी साथ लाभली व आई सौ. सूचिता साळवे आणि बहीण यांनी प्रोत्साहन दिले.
त्याने संपूर्ण बारावी पर्यंतचे शिक्षण ग्रामीण भागात पूर्ण केले.
उत्कर्ष आश्रम शाळा,सोमेश्वर विद्यालय,एम.एस.काकडे महाविद्यालय येथून त्याने बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.COMEDK ही परीक्षा उत्तीर्ण होत B.E ऐरोस्पेस इंजिनिरिंग  (बंगलोर) RVCE  येथे त्यांची निवड झाली व आता Graduate Aptitude Test (GATE) ही परीक्षा देऊन All India Rank घेऊन यशस्वी झाला व भारत देशातील क्रमांक एक IIT चेन्नई येथे M.tech एरोस्पेस इंजिनिरिंग करीता निवड झाल्याने तो सध्या तेथे शिक्षण घेत आहे.भविष्यात त्याला अंतरिक्ष संशोधनात खूप मोठी संधी मिळेल ही त्याची कामगिरी अत्यंत अभिमानास्पद आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test