वाल्हेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना अभिवादन.
पुरंदर तालुक्यातील वाल्हे नगरीत श्री.संत सावता माळी तरुण मंडळ व महात्मा फुले विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी ग्रामस्थांसह विविध राजकीय तथा सामाजिक मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून फुलेंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी श्री संत सावता माळी चौकामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात वाल्हे गावचे माजी सरपंच विमल भुजबळ व सामाजिक कार्यकर्त्या आशा भुजबळ यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.या दरम्यान विद्यमान सरपंच अतुल गायकवाड यांसह इतर मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी वागदरवाडी गावचे सरपंच सुनील पवार,वाल्हे गावचे माजी सरपंच दत्तात्रेय पवार,महादेव चव्हाण, संत सावता माळी समाज मंडळाचे अध्यक्ष त्रिंबक भुजबळ, महात्मा फुले प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष भुजबळ, उपसरपंच अमित पवार, युवा नेते सागर भुजबळ,तसेच शशिकांत भुजबळ,प्रवीण भुजबळ, शिरीष नवले,नारायण दुर्गाडे,सुजित राऊत,सचिन भोसले यांसह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.