आपण पाहिलं का ? कधी.... काव्यमय विवाह सोहळा....त्या साहित्यप्रेमींची .....
५०१ काव्य,कथा, आत्मचरित्र,भगवदगीता,तसेच अध्यात्मिक पुस्तक येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांना भेट
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील होळ गावचे रहिवासी.पंचक्रोशी प्रकाशन संस्था संपादक अध्यक्ष श्री बाळासो विठ्ठल करचे यांचा कनिष्ठ सुपुत्र प्रसाद बाळासो करचे तसेच श्री शंकर चोरगे यांची सुकन्या चि सौ का रेणुका शंकर चोरगे सातारा यांचा शुभ विवाह सोमवार दि.८जानेवारी २०२४ रोजी अभिषेक पॅलेस दहा फाटा येथे मोठ्या थाटामाटाने संपन्न झाला....
बाळासो करचे हे एक अलौकिक प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व आहे..साहित्यासाठी स्वतः दिवस रात्र झटत असतात...त्यांनी आज आपल्या मुलाच्या विवाह प्रसंगी ५०१ काव्य,कथा, आत्मचरित्र,भगवदगीता,तसेच अध्यात्मिक पुस्तक येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांना भेट दिले....त्यांच्या या साहित्य वेडाचे हे जिवंत उदाहरण...खूप अलौकिक भेट त्यांनी दिली... खरचं आहेर देणे घेणे यापेक्षा समाजाला कशाची भूक लागली पाहिजे हे त्यांच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमातून दिसून येते.. शुभ विवाह प्रसंगी राजकीय नेते तसेच साहित्यिक मंडळी .पंचक्रोशी मधील नातेवाईक ,शेतकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजातील प्रत्येक व्यक्तीने यांच्या कडून आदर्श घ्यावा असे कार्य संपन्न झाले... वाचाल तर वाचाल.या उक्तीप्रमाणे