सुपा ! रोटरी क्लब ऑफ सुपे वतीने नेत्र तपासणी शिबीर
बारामती प्रतिनिधी - रोटरी क्लब ऑफ सुपे परगणा (ता बारामती) कार्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे जयंती निमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले.
या वेळी स्वामी विवेकानंद जेष्ठ नागरिक संघ सुपे, रोटरी क्लब ऑफ सुपे परगणा,उज्वल प्रतिष्ठान जळगाव सुपे यांचे संयुक्तमाने व बुधरानी हाॅस्पीटल पुणे यांचे मार्गदर्शनाखाली मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.या शिबिरात ६२ रूग्णांची नेत्र तपासणी नेत्रतज्ञ डाॅ.वैभव गाढवे यांनी केली.२२रूग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवडले असल्याची माहिती बोलताना दिली.