Type Here to Get Search Results !

सत्तेची नशा आपल्या डोक्यात कधी चढली नाह -हर्षवर्धन पाटील.

सत्तेची नशा आपल्या डोक्यात कधी चढली नाह -हर्षवर्धन पाटील.
हर्षवर्धन पाटलांचा भरणे यांना उपरोधीक टोला.

इंदापूर : मी गेल्या चाळीस वर्षापासुन सार्वजनिक जिवनामध्ये काम करत असताना, मी कुठल्या पदावर आहे किंवा नाही याची मला आयुष्यात कधीही जाणिव झाली नाही.आणि होणारही नाही.कारण आपल्या  डोक्यात सत्तेची हवा कधी चढलीच नसल्याचा उपरोधीक टोला माजी सहकार व संसदिय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दत्तात्रय भरणे यांचे नाव न घेता भरणे यांना लगावला.

  फुले प्रहार सामाजिक संस्थेच्या वतीने शनिवारी इंदापूर शहरातील राधीका हाॅल येथे पत्रकार पत्रकार दिन व पत्रकार सन्मान सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी हर्षवर्धन पाटील बोलत होते.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, जि.प.मा. बाधकाम सभापती प्रविण माने,इंदापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती
 मयरसिंह पाटील इत्यादी उपस्थित होते.एखाद्याचे काम नाही झाले तरी चालेल, परंतु कोणावर अन्याय होणार नाही ही भुमीका आपण सातत्याने स्विकारली आहे.आज विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला व पत्रकार यांचा सन्मान झाला आहे.

        मान सन्मान हा मागुन मिळत नाही,तो कृतितुन मिळवावा लागतो.माझ्या मते आज तो पत्रकार दिनाच्या निमित्ताने पत्रकारांनी सर्वांचा मान सन्मान केला आहे.
त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.इथे आल्यानंतर पत्रकारांनी येणार्‍या पाहुन्यांना टोप्या आणी पत्रकारांना फेटे बांधले.मी आयुष्यात पहिल्यांदा पाहीले की पत्रकारसुद्धा आम्हाला टोपी घालु शकतो, आणि आम्हीसुद्धा पत्रकारांना फेटे बांधु शकतो असे मिश्कील उदाहरण देताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. हे लोकशाहीचे आदर्शवत उदाहरन उदारण असल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले.हा कार्यक्रम सर्वांमध्ये मैत्रीचे नाते संबध निर्माण करणारा असल्याने आयोजक व पत्रकार यांचे मनापासुन अभिनंदन केले.

       भविष्य काळात पत्रकारांनी आपल्या लेखनितुन इंदापूर तालुक्याचा खर्‍या अर्थाने कायापालट घडवावा.
लेखनिच्या माध्यमातुन खर्‍याला खरे आणि खोट्याला खोटे हे आपल्या पत्रकारांच्या माध्यमातुन या राज्याला दाखवून द्यावे.मणुष्य जन्माला आल्यानंतर वाद विवाद होत असतात, परंतु कुठेतरी मागे पुढे सरकुन तडजोडी कराव्या लागतात.आम्ही सुद्धा जिवनात थो मागे सरलो व थोडे पुढेही सरलो, कुठेतरी दोन पावले मागे पुढे घ्यावी लागतात.जो खर्‍या अर्थाने प्रामाणिकपणे किम करतो त्याला योग्य न्याय मिळतो.पत्रकार भवनसाठी योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन पुणे जिल्हा मध्यवर्ती सह.बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगीतले.
        
    याप्रसंगी कृष्णा ताटे, विठ्ठल ननवरे, शिवाजीराव मखरे, कैलास कदम, युवराज मस्के,रघुनाथ राऊत,दत्तात्रय अनपट, संदिपान कडवळे, बाबासाहेब भोंग, शकील सय्यद,
अॅड.नितिन राजगूरू,गणेश घुगे, सागरबाबा मिसाळ, आणिलअण्णा पवार, युवराज पोळ,बाळासाहेब सरवदे,
ललेंद्रभाऊ शिंदे, राजेंद्र हजारे, दत्ताभाऊ जगताप, तानाजी धोत्रे, रमेश राऊत,सुधिर मखरे,धरमचंद लोढा,आमोल देवकाते,नितिन आरडे, आशोक पोळ,पिंटुशेठ घोडके, वसिमभाई बागवान, श्रीकांत मखरे,हमिद आतार,
बाळासाहेब क्षिरसागर,अर्शाद सय्यद, प्रविण पवार, बंडा पाटील,दत्ताभाऊ पांढरे,जयश्री खबाले,माधवी सोननिस, महेश वाघमारे इ.प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

       तर पत्रकार तानाजी काळे, मंगेश कचरे, नितिन चितळकर, डाॅ.गजानन टिंगरे, सुरेश मिसाळ,विकास कोकरे,काकासाहेब मांढरे, वसंतराव मोरे,राजेंद्र कवडे-देशमुख, संदिप बल्लाळ,नवनाथ बोरकर,दत्ता मिसाळ,नाथा सोनकांबळे,निलेश भोंग,राजाभाऊ लोंढे,संतोष खिलारे,
संतोष जामदार, बाळासाहेब जामदार, जितेंद्र जाधव,
इम्तियाज मुलाणी,सिद्धार्थ मखरे,सचिन खुरंगे,सचिन खरमाटे,डाॅ.सिद्धार्थ सरवदे,बापू बोराटे,आदित्य बोराटे, शहाजीराजे भोसले, प्रदिप तरंगे,राकेश कांबळे, गणेश कांबळे, श्रीयश नलवडे,कुंदन वजाळे,भिमसेन उबाळे, तुषार क्षिरसागर, प्रसाद तेरखेडकर,धनाजी शेंडगे,तुकाराम पवार,शिवाजी शिंदे,आमोल राजपुत,राजकुमार वजाळे, भगवान मोरे (सर) धनाजी शेंडगे,आण्णा गायकवाड,लक्ष्मन भिसे, आमोल तोरणे, आशोक घोडके, निलेश गायकवाड, संजय शिंदे,मुक्तार काझी,सतिश जगताप, सलिम शेख यांचेसह मोठ्या प्रमाणातपत्रकार उपस्थित होते.प्रस्ताविक प्रकाश आरडे यांनी केले तर सुत्र संचलन संतोष नरूटे यांनी केले व आभार सुधाकर बोराटे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test